ETV Bharat / state

मोबाइल नेटवर्कविना हैराण ग्रामस्थांनी गावच काढले विकायला!

author img

By

Published : Oct 31, 2020, 1:17 PM IST

सध्याच्या डिजिटल युगात मोबाइल आणि इंटरनेट दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. या दोन्हीपैकी एकही बाब नसेल तर, माणूस त्रस्त होतो. औरंगाबाद जिल्ह्यात असे एक गाव आहे, तिथे मोबाइलला नेटवर्कच मिळत नाही.

Bhadji village
भडजी गाव

औरंगाबाद - डिजिटल इंडियाच्या नावाखाली सर्वत्र ऑनलाइन व्यवहार होत आहेत. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील एका गावात इंटरनेट राहीले दूर, पण अद्याप मोबाइलला नेटवर्कच येत नाही. या प्रकारामुळे त्रस्त गावकऱ्यांनी आता गावच विकायला काढले आहे. तसा फलकच गावकऱ्यांनी गावाच्या वेशीवर लावला. खुलताबाद तालुक्यातील 'भडजी' असे विक्रीला काढलेल्या गावाचे नाव आहे.

भडजी गावातील ग्रामस्थ मोबाईल नेटवर्क नसल्याने त्रस्त झाले आहेत

कंपन्यांकडून शून्य प्रतिसाद -

देश आता डिजिटल होत आहे. पैशांच्या देवाणघेवाणीपासून ते शिक्षणापर्यंत सर्वच ऑनलाइन झाले आहे. मात्र, खुलताबाद - फुलंब्री रस्त्यावर असलेल्या भडजी या गावात फोनला नेटवर्कच नसल्याने कोणाशीही संपर्क होत नाही. या गावाची लोकसंख्या 2 हजार 800 आहे. मोबाइल क्रांती होऊन बरीच वर्षे लोटली आहेत. आता 5G प्रणाली लवकरच ग्राहकांच्या सेवेत आणण्यासाठी वेगाने काम होत आहे. या सर्व क्रांतीपासून हे गाव आणि गावकरी अजून लांबच आहे. टेलिकॉम कंपन्यांना अर्ज करूनही अद्याप कोणतीही कंपनी या गावाला सेवा देऊ शकली नाही, त्यामुळेच गाव विक्रीला काढल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

गावकऱ्यांचे सुरू आहे 'शोधू कुठे, शोधू कुठे' -

भडजी गावात नेटवर्क नसल्याने मोबाइल शोभेची वस्तू बनली आहे. सर्वांच्या खिशात मोबाइल आहे मात्र, त्याचा उपयोग ना कोणाशी संभाषण करण्यासाठी होतो, ना ऑनलाइन काम करण्यासाठी! कोणाशी संवाद साधायचा असेल तर, उंच ठिकाणी, घराच्या छतावर अथवा महामार्गावर जावे लागते. घराच्या आत मोबाइल नेटवर्क नसल्याने किमान फोन तरी यावा, यासाठी बहुतांश लोकांनी आपल्या दरवाजाबाहेरच मोबाइल ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. कोणी स्टँड तयार केले आहे तर, कोणी फळी लावली आहे. कधी-कधी तर मोबाइल घेऊन नेटवर्कच्या शोधात आसपासच्या परिसरात फिरावे लागते

ऑनलाइन शिक्षणापासून विद्यार्थी वंचित -

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. मात्र, भडजी गावात नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. घरात नेटवर्क नसल्याने विद्यार्थी मोबाइल घेऊन अंगणात बसतात. गावात काही ठराविक ठिकाणीच कसे-बसे 2G किंवा 3G नेटवर्क मिळते. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण कसे घ्यावे? असा प्रश्न गावातील पालक आणि विद्यार्थ्यांना पडला आहे.

ग्रामपंचायतला काम करणे झाले अवघड -

ग्रामपंचायत कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या ऑनलाइन सुविधा देखील गावकऱ्यांना मिळत नाहीत. सातबारा काढणे, उत्पन्नाचा दाखला देणे, रहिवासी दाखला देणे, अशा सुविधा फक्त कागदावरच राहिल्या आहेत. परिणामी ऑनलाइन दाखले काढण्यासाठी खुलताबाद किंवा औरंगाबादचा प्रवास गावकऱ्यांना करावा लागतो.

सैन्यातील मुलासोबत बोलू शकत नसल्याची आईला खंत -

गावात राहणाऱ्या हिराबाई पुरी यांचा मुलगा सैन्यात जवान आहे. घरापासून शेकडो किलोमीटर लांब असलेल्या मुलाची आईला नेहमी चिंता असते. त्याच्याशी बोलून त्याची विचारपूस करावीशी वाटते. त्याचा फोन आला तर, त्याच्यासोबत मनसोक्त गप्पा माराव्याशा वाटतात. मात्र, मोबाइलला नेटवर्कच नसल्याने अडचण येते, अशी खंत हिराबाई पुरी यांनी ईटीव्ही भारताकडे व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.