ETV Bharat / state

Shiv Temple In Verul : देशातील सर्वात मोठे शिवमंदिर वेरूळमध्ये; महाशिवरात्रीला भक्तांसाठी झाले खुले - महाशिवरात्री बातम्या

महाशिवरात्रीनिमित्त औरंगाबादच्या वेरूळ जवळ देशातील सर्वात मोठे शिव मंदिर भक्तांसाठी खुले केले जाणार आहे. साठ फुटी शिवलिंगाची प्रतिकृती असणारे मंदिर असून, गाभाऱ्यात एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. (largest Shiva temple in the country at Verul) या मंदिराचे निर्माण कार्य जवळपास 23 वर्षांपासून सुरू होते. ते पूर्ण झाले असून महाशिवरात्रीनिमित्त सर्वांसाठी हे मंदिर खुले करण्यात आले आहे.

वेरुळ येथील मंदिर
वेरुळ येथील मंदिर
author img

By

Published : Mar 1, 2022, 7:31 AM IST

Updated : Mar 1, 2022, 1:27 PM IST

औरंगाबाद - महाशिवरात्रीनिमित्त औरंगाबादच्या वेरूळ जवळ देशातील सर्वात मोठे शिव मंदिर भक्तांसाठी खुले केले जाणार आहे. साठ फुटी शिवलिंगाची प्रतिकृती असणारे मंदिर असून, गाभाऱ्यात एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या मंदिराचे निर्माण कार्य जवळपास 23 वर्षांपासून सुरू होते. ( Mahashivaratri at Verul) ते पूर्ण झाले असून महाशिवरात्रीनिमित्त सर्वांसाठी हे मंदिर खुले करण्यात आले आहे.

देशातील सर्वात मोठे शिवमंदिर वेरूळमध्ये

असे आहे मंदिर

वेरूळ हा प्रस्तुत परिसर तीन धर्मांचे दर्शन घडवणाऱ्या लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर-12 ज्योतिर्लिंग यापैकी सर्वात शेवटचे ज्योतिर्लिंग असलेले घृष्णेश्वर मंदिर देखील ह्याच परिसरात आहे. त्यात आता भर पडली असून देशातील सर्वात मोठं शिवमंदिर इथं उभारले जात आहे. वेरूळहुन कन्नड कडे जात असताना, श्री विश्वकर्मा तीर्थ धाम संस्था या ठिकाणी श्री भगवान विश्वकर्मा चे मंदिर आहे. (mahashivaratri in aurangabad district) याच परिसरात बारा ज्योतिर्लिंग मंदिराचे काम सुरू करण्यात आले होते. मंदिर परिसर 108 बाय 108 फूट आकाराचा आहे. जमिनीपासून शिवलिंगाची उंची 60 फूट तर, मंदिराच्या छतापासून 40 फूट इतकी आहे. शाळुंका 38 फूट रुंद आहे. पावसाळ्यात ट्वेंटी वर पडणारे पाणी साळुंकेतून खाली पडताना चे दृश्य निसर्गरम्य असावे अशी रचना करण्यात आली आहे.

अशी असेल रचना

भगवान शंकराचे ज्योतिर्लिंग वेगवेगळ्या परिसरात आहे. प्रत्येकाचे महत्त्व वेगळे आहे. बारा ज्योतिर्लिंग देशभरात आहेत आणि त्या सर्वांचे दर्शन घेता यावं ही प्रत्येक भाविकाची इच्छा असते. मात्र प्रत्येक भाविक प्रत्येक मंदिरात जाऊ शकतो अस होत नाही. त्यामुळेच शिवभक्तांना एकाच ठिकाणी भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन व्हावं, याकरिता या मंदिराचे निर्माण करण्यात आल आहे. भाविकांना आता एकाच मंदिरात बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येणार आहे. हा उद्देश करून मंदिराची उभारणी केल्यास मंदिर विश्वस्तांनी सांगितलं.

हेही वाचा - Visit 12 Jyotirlingas on Mahashivratri : महाशिवरात्री निमित्ताने करा 12 ज्योतिर्लिंगांंचे दर्शन

Last Updated : Mar 1, 2022, 1:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.