औरंगाबाद - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज ( बुधुवार) दुपारी जाहीर करण्यात आला. औरंगाबाद विभागाचा सरासरी निकाल 92 टक्के इतका लागला आहे. यंदाही विभागातून मुलींनीच बाजी मारली असली तरी विभागाच्या तुलनेत औरंगाबाद विभाग शेवटच्या क्रमांकावर आहे.
कोरोनाच्या सावटाखाली झालेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल यंदा जवळपास महिनाभर उशिराने लागला आहे. ६२४ केंद्रावर घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला औरंगाबाद विभागातून १ लाख ८५ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ८४ हजार ७६४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ६९ हजार ९९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होत असताना दहावीची लेखी परीक्षा ३ मार्च ते २३ मार्च या काळात घेण्यात आली. मात्र, सर्वात शेवटी असलेला भुगोलाचा पेपर रद्द केला होता. लॉकडाऊनमूुळे उत्तरपत्रिका पोस्टामध्येच अडकून पडल्या होत्या. लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचं विभागीय मंडळातील संकलन करून निकाल लावण्याचे आव्हान बोर्डापुढे होते. त्यातच भुगोल विषयांची परीक्षा न झाल्याने त्याचे गुण देण्याबाबत अनेक संभ्रम होते. त्यात परीक्षा मंडळाने निर्णय घेत बाकीच्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्या प्रमाणे रद्द झालेल्या भुगोल विषयाचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत तर छायांकितप्रतीसाठी ३० जुलै ते १८ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत अनिवार्य असून ही प्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत विहित शुल्क भरुन विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
औरंगाबाद विभागाचा सरासरी निकाल 92 टक्के, मात्र विभागाच्या तुलनेत तळाला - औरंगाबाद न्यूज
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज ( बुधुवार) दुपारी जाहीर करण्यात आला. औरंगाबाद विभागाचा सरासरी निकाल 92 टक्के इतका लागला आहे.