ETV Bharat / state

शिक्षक गजानन खैरे यांच्या आंदोलनाची तत्काळ दखल घ्या, शिक्षक संघटनेची मागणी - शिक्षकाचे अन्नत्याग आंदोलन

विनाअनुदानित शिक्षकांना त्यांच्या हक्काचे शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, यासाठी आज कन्नड येथे विनाअनुदानित शिक्षक संघटनेतर्फे तहसील विभाग व पंचायत समिती शिक्षण विभाग येथे निवेदन देण्यात आले.

शिक्षकांचे निवेदन
शिक्षकांचे निवेदन
author img

By

Published : Aug 6, 2020, 4:18 PM IST

कन्नड (औरंगाबाद) - महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, घोषित, अघोषित अंशतः अनुदानित शाळांमधील जवळपास 60 हजार विनाअनुदानित शिक्षक हे सध्या निराशेतून जीवन जगत आहेत. या शिक्षकांना प्रचलित नियमाने 100 टक्के अनुदान मिळावे, यासाठी शिक्षक गजानन खैरे यांनी अन्नत्याग आंदोलन केले आहे.

अन्नत्याग करून क्रांती चौक, औरंगाबाद येथून मुख्यमंत्री निवास, शिक्षण विभाग, मंत्रालय, राज्यपाल भवन इत्यादी ठिकाणी त्यांची 27 जुलैपासून पायी दिंडी चालू आहे. त्यांनी अकरा दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. यामुळे त्यांची तब्येत पूर्णपणे खालावलेली आहे. तरी त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात यावी व विनाअनुदानित शिक्षकांना त्यांच्या हक्काचे शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, यासाठी आज कन्नड येथे विनाअनुदानित शिक्षक संघटनेतर्फे तहसील विभाग व पंचायत समिती शिक्षण विभाग येथे निवेदन देण्यात आले.

यावेळी योगेश जंजाळ, दत्तात्रय गायके, करण राठोड, शिवराज पाटील, ज्ञानेश्वर नायकुडे लक्ष्मण पांडव, अतिश जगताप, श्रीराम जाधव, अमोल घुगे, हारून शेख, पठाण समिउल्लाह जुनेद कादरी, अमीन शेख, आमेर शेख, शाहेद शेख अमीर अली अजीज शेख, प्रवीण दाभाडे यांची उपस्थिती होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.