ETV Bharat / state

Shivaji Maharaj Photobiography : औरंगाबादमध्ये शिक्षकाने जिल्हापरिषदेच्या शाळेतील भींतीवर उतरविला शिवकालीन इतिहास

author img

By

Published : Feb 19, 2022, 6:51 PM IST

सिल्लोड तालुक्यातील खातखेडा येथील साईनाथ फुसे ( Sillod Sainath Fuse Art ) या अवलिया कला शिक्षकाने आपल्या कला आविष्काराने शाळेतील भिंतीवर ( Shivaji Maharaj Photobiography On School Wall ) छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा चित्रमय जीवन प्रवास आपल्या कुचल्यानी भींतीवर उतरविला आहे.

Shivaji Maharaj Photobiography
Shivaji Maharaj Photobiography

औरंगाबाद - जिल्हा परिषदेचा शाळा म्हटले, तर अनेक जन नाक मुरडतात. मात्र, आजमितीला ग्रामीण भागात ज्ञानाची गंगा पोचविण्याचे काम जिल्हा परिषद मोठ्या दिमाखात काम करीत आहे. अनेक होतकरू शिक्षक वर्ग जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मोठ्या कष्टाने विध्यार्थ्यांना ज्ञानार्जन करीत आहे. सिल्लोड तालुक्यातील खातखेडा येथील साईनाथ फुसे ( Sillod Sainath Fuse Art ) या अवलिया कला शिक्षकाने आपल्या कला आविष्काराने शाळेतील भिंतीवर ( Shivaji Maharaj Biography On School Wall ) छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा चित्रमय जीवन प्रवास आपल्या कुचल्यानी भींतीवर उतरविला आहे.

चित्रमय जीवनपट केला उभा -

जवळपास ६०० लोक संखा असलेल्या या गावात पहिली ते तिसरीपर्यंतचे वर्ग या शाळेत आहेत. या शाळेतील विध्यार्थी हे सर्व सामान्य कुटुंबातील आहे. या विद्यार्थ्यांना इतिहास विषयाची गोडी लागावी म्हणून कला शिक्षक साईनाथ फुसे यांनी शाळेच्या भींतीवर काढलेली शिवकालीन चित्रे इतिहास विषय शिकवताना सहा शिक्षकांना अत्यंत सोपे जात आहे. इतिहासातील दाखले देण्यासाठी या चित्राचा उपयोग शिक्षक वर्ग करीत असल्याचे दिसून येत आहे. त्याच बरोबर शिक्षक शिकवीत असताना चित्राचे दाखले दिल्यामुळे शाळेतील विधार्थ्यांना आता इतिहास विषयाची चांगलीच गोडी लागली आहे.

Shivaji Maharaj Photobiography
छत्रपती शिवाजी महारांजा जीवनपट
कला शिक्षक फुसे यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या भाषेत इतिहास शिकविण्यात यावा, या करीता लॉक डाऊनच्या काळात आपल्या शाळेतील सहकाऱ्यांसमवेत भींतीवर छत्रपती शिवाजी महाराजाचा भव्य, असा चित्रमय जीवनपट उभा केला आहे.
Shivaji Maharaj Photobiography
छत्रपती शिवाजी महारांजा जीवनपट

अनुदान मिळण्याची मागणी -

या शाळेतील शिक्षकांचा वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा मानस आहे. मात्र, निधी अभावी त्यांना अनेक अडचणी येत आहेत. विविध शिक्षण उपयोगी उपक्रम राबविण्यासाठी निधी उभारणे गरजेचे झाले आहे. सिल्लोड सारख्या ग्रामीण भागात उपक्रमशील विविध शिक्षकांच्या उपक्रमाला शासन स्थरावर विशेष, असे अनुदान दिले गेले पाहिजे. शासनाने उप्रकम शील शिक्षक वर्गाला प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.

हेही वाचा - D Company re-activates : डी कंपनी पुन्हा सक्रिय मनी लाँडरिंग सिंडिकेटमध्ये डिजिटल वॉलेट, डार्कनेटचा वापर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.