ETV Bharat / state

मतदानाला आलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांचा मृतदेह घेण्यास नकार

author img

By

Published : Oct 31, 2019, 7:04 PM IST

मतदान करण्यासाठी आलेल्या तरुण रस्त्यावर संशयास्पदरित्या जखमी अवस्थेत घाटी येथे आढळला होता. मात्र, उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. परंतु, हा अपघात नसून घातपाताचा प्रकार आहे. जोपर्यंत हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी अटक होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

अविनाश रमेश राठोड

औरंगाबाद - मतदान करण्यासाठी आलेल्या तरुण रस्त्यावर संशयास्पदरित्या जखमी अवस्थेत घाटी येथे आढळला होता. मात्र, उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. परंतू, हा अपघात नसून घातपाताचा प्रकार आहे. जोपर्यंत हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

औरंगाबादमध्ये मतदानाला आलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांचा मृतदेह घेण्यास नकार

हेही वाचा - बुलडाण्यात अवैध तिकीट बुकिंग सेंटरवर आरपीएफ दलाचा छापा

अविनाश रमेश राठोड (वय-30) मृत तरुणाचे नाव असून उबरंखेडा (कन्नड) येथील रहिवासी होता. 21 ऑक्टोबर रोजी अविनाश हा कन्नड येथून मतदान करण्यासाठी उंबरखेडा येथे आला होता. मतदान केल्यानंतर तो रात्री पुन्हा गावाकडे निघाला होता. मात्र, रात्री नऊच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला तो जखमी अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी त्यास उपचारकामी घाटी रुग्णालयात हलविले होते. तेव्हापासून त्यावर उपचार सुरू असताना बुधवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली. अविनाशच्या मृत्यूची बातमी कळताच नातेवाईकांनी घाटी रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहाजवळ गर्दी केली होती. यावेळी उपस्थित पोलिसांकडे हत्येचा गुन्हा दाखल करा अशी मागणी नातेवाईकांनी केली.

चौकशीअंती निर्णय घेतला जाईल अशी भूमिका पोलिसांची घेतली आहे. मात्र, नातेवाईक हत्येचा गुन्हा दाखल करण्याच्या भूमिकेवर अडले होते. हा अपघात नसून गावातील काही लोकांनी मारहाण केली आहे असा आरोप नातेवाईक करीत आहे. याप्रकरणी जोपर्यंत हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. खुलताबाद पोलीस दुपारपर्यंत नातेवाईकांची समजूत काढत होते.

हेही वाचा - नांदेड : 'त्या' सराफा व्यापाऱ्याची हत्या पूर्ववैमनस्यातून?...

Intro:मतदान करण्यासाठी आलेला तरुण रस्त्यावरती संशयास्पदरित्या जखमी अवस्थेत आढळला होता उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला मात्र हा अपघात नसून घातपाताचा प्रकार आहे जोपर्यंत हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही ही अशी भूमिका नातेवाइकांनी घेतल्याने घाटीत काही वेळेस गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.अविनाश रमेश राठोड वय-30 वर्ष (रा.उबरंखेडा, ता.कन्नड) असे मृत तरुणाचे नाव आहे.
Body:21 ऑक्टोबर रोजी अविनाश हा कन्नड येथून मतदान करण्यासाठी उंबरखेडा येथे आला होता. मतदान केल्यानंतर तो रात्री पुन्हा गावाकडे निघाला होता मात्र रात्री 9 वाजेच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला तो जखमी अवस्थेत आढळला होता.पोलिसांनी त्यास उपचारकामी घाटी रुग्णालयात हलविले होते.तेंव्हा पासून त्यावर उपचार सुरू असताना बुधवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली. अविनाश च्या मृत्यूची बातमी कळताच नातेवाईकांनी घाटी रुग्णालयाच्या शवविच्छेदनगुहा जवळ गर्दी केली होती. या वेळी उपस्थित पोलिसांना हत्येचा गुन्हा दाखल करा अशी मागणी नातेवाईकांनी केली मात्र चौकशीअंती निर्णय घेतला जाईल अशी भूमिका पोलिसांची होती. मात्र नातेवाईक हत्येचा गुन्हा दाखल करण्याच्या भूमिकेवर अडले होते. हा अपघात नसून गावातील काही लोकांनी मारहाण केली आहे असा आरोप नातेवाईक करीत आहे.या प्रकरणी जो पर्यंत हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी अटक होत नाहीत तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. खुलताबाद पोलीस दुपारपर्यंत नातेवाईकांची समजूत काढत होती.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.