ETV Bharat / state

औरंगाबादच्या बाजारपेठेत 'पंखा टोपी' ठरतेय आकर्षणाचा केंद्रबिंदू - Summer Session

औरंगाबाद शहरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक अनेक उपाययोजना करत आहेत. बहुतेक जण टोपी विकत घेत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

औरंगाबादच्या बाजारपेठेतील 'पंखा टोपी'
author img

By

Published : Apr 25, 2019, 10:36 PM IST

औरंगाबाद - शहरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक अनेक उपाययोजना करत आहेत. अनेक जण टोपी विकत घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच बाजारपेठेत आलेली पंखा टोपी लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

औरंगाबादच्या बाजारपेठेतील 'पंखा टोपी'

आपण नेहमी वापरतो त्या प्रकारच्या टोपीवर एक पंखा लावण्यात आला असून तो पंखा सोलर पॅनलवर चालतो. टोपीवर लावलेल्या पंख्यामुळे उन्हात देखील चेहऱ्यावर हवा लागत राहते, त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळत असल्याचे खरेदीदारांचे म्हणने आहे.

औरंगाबादेत उन्हाचा पारा ४२ अंशाच्या वर जातोय. उन्हापासून वाचण्यासाठी नवनवीन शक्कल लढविल्या जातायेत. उन्हाच्या झळापासून वाचण्यासाठी बहुतांश नागरिक टोपी किंवा रुमाल विकत घेतांना दिसत आहेत. त्यातच बाजारात आलेली ही पंखा टोपी लहान मुलांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. उन्हात या टोपीतील पंखा आपोआप सुरू होतो आणि सावलीत गेले की पंखा बंद होतो. औरंगाबादच्या गुलमंडी भागात विजय रोजेकर या व्यावसायिकाने ही अफलातून टोपी विक्रीसाठी आणली आहे. गेल्या महिनाभरात चारशेपेक्षा अधिक पंखा टोपीची विक्री झाल्याची माहिती व्यावसायिक विजय रोजेकर यांनी दिली.

Intro:औरंगाबादेत उन्हाचा पारा चांगलाच चढला असून उन्हं पासून रक्षण करण्यासाठी अनेक जण टोपी विकत घेत असल्याच दिसून येत आहे. त्यातच बाजारपेठेत आलेली पंखा टोपी लहान मुलांना आकर्षित करत आहे.

Body:टोपीकर एक पंख लावण्यात आला असून तो पंख सोलर पॅनल वर चालतो. टोपीकर लावलेल्या पंख्यामुळे उन्हात देखील चेहऱ्यावर हवा लागत राहते, त्यामुळे गर्मीत देखील थोडा दिलासा मिळतोय.

Conclusion:औरंगाबादेत उन्हाचा पारा 42 अंशाच्या वर जातोय. उन्हापासून वाचण्यासाठी नवनवीन शक्कल लावताना दिसत आहेत. उन्हापासून वाचण्यासाठी अनेक जण टोपी किंवा रुमाल विकत घेत आहेत. त्यात बाजारात आलेली ही पंखा टोपी बाजारात लहान मुलांसाठी आकर्षण ठरत आहे. उन्हात या टोपीतला पंखा आपोआप सुरू होतो आणि सावलीत गेलं की पंखा बंद होतो. औरंगाबादच्या गुलमंडी भागात विजय रोजेकर या व्यावसायिकाने ही अफलातून टोपी विक्रीसाठी आणली आहे. गेल्या महिनाभरात चारशेच्या वर पंखा टोपीची विक्री झाल्याची माहिती व्यावसायिक विजय रोजेकर यांनी दिली.
byte - विजय रोजेकर - व्यावसायिक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.