ETV Bharat / state

आरएसएसशी संबंध सांगणाऱ्या जलील यांनी पुरावे दिले नाहीत - सुजात आंबेडकर

वंचित आणि एआयएमआयएम पक्षांच्या युती संदर्भात बोलताना ते म्हणाले, आघाडीच्या दारावर ज्यांनी कुलूप लावले आहे, त्यांनीच ते कुलूप उघडावे. कारण, जो शेवटी कुलूप लावतो चावी त्याच्याकडेच असते आणि तोच दरवाजा उघडू शकतो, असा टोलाही त्यांनी खासदार जलील यांना लगावला. तसेच वंचित आणि एमआयएम यांच्यात अजूनही आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तासापर्यंत आमचे दरवाजे हे उघडे ठेवलेले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुजात यांच्या उपस्थितीत शहरात युवकांचा संवाद मेळावा घेण्यात आला.
author img

By

Published : Sep 26, 2019, 11:35 AM IST

Updated : Sep 26, 2019, 2:56 PM IST

औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडी पासून वेगळे झाल्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी आरएसएसचे काही लोक वंचितमध्ये असल्याचा आरोप केला होता. मात्र, त्या आरोपांवर खासदार जलील यांनी कुठलेच पुरावे सादर केलेले नाहीत, असे स्पष्टीकरण वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिले. तसेच खासदार जलील हे पत्रकार होते. त्यामुळे त्यांनी पुरावे सोबत ठेवूनच बोलायला हवे, असेही सुजात यांनी म्हटले आहे. सुजात यांच्या उपस्थितीत शहरात युवकांचा संवाद मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

आरएसएसशी संबंध सांगणाऱ्या जलील यांनी पुरावे दिले नाहीत - सुजात आंबेडकर

हेही वाचा - ईडीचा पाहूणचार स्वीकारण्यासाठी जाणार, पवारांनी केले स्पष्ट

वंचित आणि एआयएमआयएमच्या युती संदर्भात बोलताना ते म्हणाले, आघाडीच्या दारावर ज्यांनी कुलूप लावले आहे, त्यांनीच ते कुलूप उघडावे. कारण, जो शेवटी कुलूप लावतो त्याच्याकडेच चावी असते आणि तोच दरवाजा उघडू शकतो, असा टोलाही त्यांनी खासदार जलील यांना लगावला. तसेच वंचित आणि एमआयएम यांच्यात अजूनही आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तासापर्यंत आमचे दरवाजे हे उघडे ठेवलेले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - सत्ताधारी पक्षातील १००-२०० जणांशिवाय काश्मीरमध्ये कोणीही आनंदी नाही - गुलाम नबी आझाद

देशात गौरी लंकेश किंवा दाभोलकर यांच्यासारख्या समाज परिवर्तन घडवणाऱ्या लोकांच्या हत्या झाल्या. या हत्येनंतर कोणी फटाके फोडले, कोणी आनंद व्यक्त केला हे पाहिले तर यामागे कोण आहे हे स्पष्ट कळेल, असे सांगत या हत्यांमागे आरएसएस असल्याची टीकाही सुजात यांनी केली. इतकेच नाही तर राज्यात भाजप सरकार पुन्हा स्थापन झाले तर मुस्लीम आणि दलितांवर होणारे अत्याचार वाढतील असा आरोप सुजात आंबेडकरांनी केला.

हेही वाचा - मुकेश अंबानी सलग आठव्या वर्षी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, पाहा एवढी आहे संपत्ती

विधानसभा निवडणुकीत राम मंदिर, काश्मिर, पाकिस्तान या मुद्द्यांना आता मतदार कंटाळले आहेत. जनतेला आज विकासाचे मुद्दे हवे आहेत आणि आम्ही याच मुद्द्यांवर निवडणूक लढवत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Intro:वंचित पासून वेगळं झाल्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी आरएसएसचे काही लोक वंचित मध्ये असल्याचा आरोप केला होता मात्र त्या आरोपांवर इम्तियाज अली यांनी कुठलेच पुरावे सादर केलेले नाहीत असं स्पष्टीकरण वंचित चे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिल. इमतियाज जलील हे पत्रकार होते, त्यामुळे त्यांनी पुरावे सोबत ठेवूनच बोलायला हवं असं देखील सुजात आंबेडकर यांनी सांगितलं.

Body:वंचित आणि एम आय एम च्या आघाडीच्या दारावर ज्यांनी कुलूप लावलं त्यांनीच ते कुलूप उघडावं कारण जो शेवटी कुलूप लावतो चावी त्याच्याकडेच असतो आणि तोच दरवाजा उघडू शकतो असा टोला सुजात आंबेडकर यांनी एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे टोलवला. सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत औरंगाबादमधे युवकांचा संवाद मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात सुजात यांनी सर्वच राजकीय पक्षांवर आरोप केले.

Conclusion:वंचित आणि एम आय एम यांच्यात अजूनही आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आम्ही निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तासापर्यंत आमचे दरवाजे हे उघडे ठेवलेले आहेत सुजात आंबेडकर यांनी औरंगाबाद सांगितलं. आमचे दरवाजे उघडे असले तरी कुलूप त्यांनी लावलंय. जो कुलूप लावतो चावी त्याच्याकडेच असते. त्यामुळे आता एमआयएमने कुलूप उघडावे अस सुजात आंबेडकरांनी सांगत आघाडी बाबतचा चेंडू जलील यांच्याकडे टोलावला. देशात गौरी लंकेश किंवा दाभोलकर यांच्यासारख्या परिवर्तन घडवणाऱ्या लोकांच्या हत्या झाल्या, या हत्येनंतर कोणी फटाके फोडले आनंद व्यक्त केला हे जर पाहिलं तर या मागे कोण आहे हे स्पष्ट कळेल अस म्हणत या हत्यांमागे आरएसएस असल्याची टीका सुजात आंबेडकरांनी केली. इतकंच नाही तर भाजपची सरकार पुन्हा आली तर मुस्लिम आणि दलितांवर होणारे अत्याचार वाढतील असा आरोप सुजात आंबेडकरांनी केला. ईडी किंवा इतर चौकशी मागे लागतील त्यामुळे राजकीय पक्ष घाबरत आहेत. कारण चौकशी झाली तर आपण दोषी आहोत हे समोर येईल म्हणून हे लोक घाबरत असल्याचं सुजात आंबेडकर यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीत राम मंदिर, कश्मीर, पाकिस्तान या मुद्द्यांवर आता मतदार कंटाळले आहेत त्यांना विकासाचे मुद्दे लागतात आणि आम्ही याच मुद्द्यांवर निवडणूक लढवत असल्याचं सुजात आंबेडकर यांनी सांगितलं.
Last Updated : Sep 26, 2019, 2:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.