वैजापूर (औरंगाबाद) - आपल्या बेधडक कार्यपद्धतीने राज्याच्या प्रशासनात वेगळा ठसा उमटवलेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर ( Aurangabad Divisional Commissioner Sunil Kendrekar ) यांनी आज औरंगाबादच्या वैजापूर येथे शासकीय कार्यलयाला अचानक भेट ( Suddenly visit of Divisional Commissioner Kendrekar in Vaijapur ) दिली. भेट दिल्यानंतर सर्वच कार्यलयाची अधिकाऱ्यांनी धावपळ सुरू झाली. स्वच्छतेचे धडे देणारे केंद्रेकर यांनी वैजापूर तहसीलदारासह गटविकास अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल्याचे पाहायला मिळाले.
नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून - वैजापूरात विभागीय आयुक्त केंद्रेकर यांची इन्ट्री होताच ते वैजापूरच्या पंचायत समिती कार्यलयावर पोहचले. तिथे पोहचताच घाणीच्या साम्राज्य दिसले, पंचायत समितीला घाणीनी वेढलेले पाहून केंद्रेकर यांनी गटविकास अधिकाऱ्याला चांगलेच खडेबोल सुनावले. नंतर केंद्रेकर यांनी आपला ताफा तहसील कार्यालयाकडे वळवला. तहसील कार्यालयात नागरिकांनची गर्दी पाहून केंद्रेकर यांनी नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यास सुरुवात केली.
विभागिय आयुक्त आधिकाऱ्यांवर संतापले - केंद्रकर यांची नजर तहसीलमध्ये असलेल्या तहसीलमधील बहूचर्चेत असणाऱ्या पुरवठा विभागाकडे गेले. केंद्रेकर पुढे जाताच तर पुरवठा विभागात एकही कर्मचारी नसल्याने केंद्रेकर यांनी तहसीलदार यांची चांगलीच हजेरी घेतली. उपस्थित नागरिकांनी तर तहसीलच्या गलथान कारभाराचा पाढाच वाचायला सुरू केल्याने तहसीलदार गायकवाड हे अचंबित झाले. केंद्रकर यांनी गायकवाड यांना नागरिकांना समोर तुमचा कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे सांगितले. तिथेच असलेले केंद्रेकर यांची नकळत नजर ही कोमजलेले व जळालेले झाडाजवळ गेली. सुकलेले झाडे व आजूबाजूला असलेली घाणीचे साम्राज्य, गुटखा खाऊन रंगलेल्या भीती पाहून केंद्रेकर अधिकच संतापले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा वैजापूर उपविभागीय कार्यालयाकडे वळवला तिथेही ही परिस्थिती पाहायला मिळाल्याने केंद्रेकर यांनी मी तुमच्या कामावर समाधानी नाही असे म्हणत ते रवाना झाले ह्या सगळ्या प्रकारानंतर केंद्रेकर हे कोणत्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - Women Parade On Gudi Padva : गिरगावमध्ये महिला बुलेटस्वारांची शोभायात्रेत रंगत