औरंगाबाद - शेतातील काम करीत असताना अचानक पाय घसरून विहिरीत पडल्याने 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना पाचोड येथील अडुळतांडा येथे घडली. पूजा बाबासाहेब राठोड (वय 17) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
हेही वाचा - नाशिक-पुणे महामार्गावरील कऱ्हे घाटात कार-ट्रकचा भीषण अपघात; 3 तरुण ठार
पूजा दुपारी शेतीकाम करण्यासाठी गेली होती. शेतातील विहिरीजवळ काम करीत असताना चिखलामुळे अचानक पाय घसरल्याने ती विहिरीत पडली. बराच वेळ झाल्याने पूजा शेतात दिसत नसल्याने नातेवाईकांनी तिचा इतर ठिकाणी शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. विहिरीच्या जवळ पाय घसरल्याच्या खुणा दिसल्याने नातेवाईकांनी विहिरीत शोध घेतला. तिला गळ टाकून बाहेर काढण्यात आले. मात्र, ती गतप्राण झाली होती. विहीर ही सुमारे 65 फूट खोल आहे. तर त्यामध्ये 50 फूटपेक्षा अधिक पाणी आहे.
हेही वाचा - पीएमसी बँकेचे ग्राहक हवालदिल; ग्राहक निर्मला सीतारमन यांना भेटणार
याप्रकरणी पाचोड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.