गंगापूर(औरंगाबाद)- गंगापुर तालुक्यातील पेंढापूर येथे गंगापूर पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर छापा टाकत धडक कारवाई केली आहे. या कारवाईत १७,४००/- रु किंमतीची दारू व एक क्रुझर वाहन असा ४ लाख १७ हजार रुयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या धडक कारवाई दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार लाख सतरा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त
गंगापुर तालुक्यातील पेंडापूर येथे अवैधपणे देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांना मिळाली. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन सायंकाळच्या सुमारास मौजे पेंढापुर येथे जावून छापा मारला. या छाप्यात भागवान आसाराम लोदवाल, देवकाबाई भगवान लोदवाल (पेंढापुर). हे त्यांच्या घरासमोर क्रूझर वाहन एम एच-२० एफ जी-३२७३ मध्ये दारूचा साठा ठेवून दारू विक्री करतांना सापडले. तसेच सदर व्यक्तीच्या घरात देखील देशी दारूचा साठा मिळून आला आहे. दोन्ही आरोपीच्या ताब्यातून दारूचे ६ बॉक्स व वाहनासह एकूण ४ लाख १७ हजारा चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाय दारूबंदी कायदा व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा प्रमाणे कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-तंबाखूजन्य पदार्थासह मोटार जप्त, दोघे अटकेत