औरंगाबाद - जिल्ह्यातील वैजापूर येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच सावत्र वडिलांनी आणि त्याच्या मित्राने बलात्कार केल्याचा खळजनक प्रकार घडला आहे. एक महिन्यापासून नराधम आरोपी त्या पीडित मुलीचे शोषण करत होता. जन्मदात्या आईनेही या कृत्याबाबत कोणताही विरोध केला नाही. पण नराधम आरोपींनी आणि तिच्या आईने पीडित मुलीच्या गुप्तांगात मिरची टाकण्याचा घृणास्पद प्रकार केला आहे.
तिघांवर गुन्हा दाखल, सावत्र बापाला अटक -
पीडितेच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसांनी आरोपी सावत्र बाप, त्याचा मित्र आणि आईविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सावत्र वडील राजू सोळसे, सतीश कनगरे आणि पीडित मुलीची आई अशी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सावत्र बापाला अटक केली असून गुन्ह्यातील आरोपी मित्र आणि पीडितेची आई फरार आहेत. आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 वर्षीय पीडित मुलगी औरंगाबाद येथे शिक्षणासाठी वसतिगृहात राहते. मात्र नुकतेच तिच्या पायाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या एक वर्षांपासून पीडित मुलगी आपल्या आई वडिलांकडे राहत होती. दरम्यान तिच्या सावत्र पित्याने तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली. यामध्ये सावत्र बापाचा अन्य एक मित्र देखील सहभागी झाला. विशेष म्हणजे पीडित मुलीच्या जन्मदात्या आईच्या संमतीने नराधम आरोपी पीडित मुलींवर लैंगिक अत्याचार करत होते.
केला असा काही घृणास्पद प्रकार -
गेल्या एक वर्षांपासून पीडित मुलीसोबत हा भयावह प्रकार सुरू होता. दरम्यान पीडित मुलीने अनेकदा तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा विरोध केला होता. पण नराधम आरोपींनी आणि तिच्या आईने पीडित मुलीच्या गुप्तांगात मिरची टाकण्याचाही घृणास्पद प्रकार समोर आला आहे. पीडितेने हा सगळा प्रकार आपल्या मावशीला सांगितला. मुलीवर होणाऱ्या अत्याचाराची माहिती मिळताच मावशीने थेट वैजापूर पोलीस ठाण्यात मुलीला आणून तक्रार दाखल केली.
हेही वाचा - छोट्या चिमुरडीला दारू पाजून नऊ वर्षीय मुलीवर बापानेच केला अत्याचार! पाहा व्हिडिओ...