कन्नड(औरंगाबाद)- लॉकडाऊन सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या औरंगाबाद पथकाने देशी दारूची अवैधपणे वाहतूक करणारा टेम्पो पकडला. या कारवाईत चारचाकी वाहनासह दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. भरारी पथकाने 1 लाख 37 हजार 440 रुपये किमतीच्या देशी दारूचे 13 बॉक्स ताब्यात घेतले.
कन्नड तालुक्यातील कालीमठ येथील आंबा रोडवरील आंबा गावाच्या शिवारात मारुती सुझुकी ओम्नी या गाडीला राज्य उत्पादन शुल्कच्या औरंगाबादच्या विभागीय पथकाने पाठलाग पकडले. यावेळी त्या गाडीत देशी दारूचे 180 मि.ली. चे 13 बॉक्स( 624 बॉटल) आढळून आले. भरारी पथकाने ते सर्व बॉक्स जप्त केले असून त्याची 1 लाख 37 हजार 440 रुपये इतकी होत असून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध दारू वाहतूक प्रकरणी संशयित आरोपी धर्मराज अनिल बच्छे व राजेंद्र गोकुळ वाघ दोघेही रा.,पाटणादेवी रोड चाळीसगांव यांना ताब्यात घेऊन कन्नड न्यायालयात गुन्हा दाखल केले असता कन्नड न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
भरारी पथकात राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय पथकाचे दुय्यम निरीक्षक पी.बी.ठाकूर, बी.के.चळणेवार,मंडलाधिकारी डी.एस.सोळुंखे, बी.बी.चळणेवार, डी. पी.लघाणे, वाहन चालक अश्फाक शेख, कन्नडचे निरीक्षक पतंगे, सहा. दुय्यम निरीक्षक पी.डी. पुरी, सुभाष गुंजाळ यांचा सहभाग होता.