औरंगाबाद : व्यसन सोडवण्यासाठी शासकीय पातळीवर काही उपाय (Solutions at govt level) केले जातात. तसाच एक प्रयत्न सिगारेटचे व्यसन सोडवण्यासाठी (Trying get rid cigarette addiction) केला जाणार आहेत. ज्यामधे आता सिंगल सिगारेट देण्यावर बंदी (Single cigarettes sale banned) घालण्यात येणार आहे. असे केल्याने व्यसन कमी करण्यास मदत होईल असे सांगण्यात येत असले तरी तज्ज्ञांंनुसार यामुळे व्यसन कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सरकारचे नियंत्रण आणण्याचे प्रयत्न आहे की, सिगारेटचा खप वाढवण्याचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Latest news from Aurangabad)
एक सिगारेट घेण्यास बंदी : धुम्रपानामुळे होणारे आजार वाढत जात आहे. कर्करोग, श्वसनाचे आजार लक्षात घेता शासनाकडून काही निबंध टाकण्यात येत आहेत. त्यामध्ये सिंगल सिगारेट म्हणजेच सुट्ट्या सिगारेट देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कमी व्यसन असणाऱ्या नागरिकांची सवय मोडेल आणि ते धुम्रपानाच्या सवयी सुटतील असा विश्वास शासनाला आहे. त्यामुळे नवीन नियमावलीत काही निर्बंध लावण्यात येणार आहेत. मात्र या नियमावली बाबत शंका व्यक्त करत व्यसन कमी होण्याऐवजी वाढेल अस मत अभ्यासक मानसोपचारतज्ञ डॉ. मोनाली देशपांडे यांनी व्यक्त केले.
निर्णायाने व्यसन वाढण्याची शक्यता : सिगारेट ओढताना काही नागरिक कमी प्रमाण असावे याकरिता रोज आपल्याला लागतील एवढ्या सिगरेट विकत घेत असतात. त्यामध्ये कोणी रोज एक दोन किंवा तीन अशा लागतात. तेवढ्यात सिगरेट खिशात ठेवून व्यसन नियंत्रणात ठेवत असतात. मात्र आता सुट्ट्या सिगरेट मिळणार नसल्याने पूर्ण पाकीट त्यांना घ्यावे लागेल. असे केल्याने खिशात सिगरेट आहेत म्हणून ते ओढण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या निर्णयाचा किती फायदा होईल हे सांगता येणार नाही, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले.
जनजागृती महत्त्वाची: धूम्रपान कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून सामाजिक संघटना आणि शासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. काही वर्षांत सिगारेटच्या पाकिटवर धुम्रपान निषेध लिहून, कॅन्सर झालेला चेहऱ्याचा फोटो त्यावर छापण्यात येतो. ज्यामुळे व्यसन करताना त्याची होणारे धोके हे त्यांना लक्षात यावे असा उद्देश होता. असे असले तरी सिगारेटचा खप कमी न होता तो वाढतच गेला आहे. त्यामुळे त्यावर निर्बंध न लावता त्याबाबत सतत जनजागृती करणे. धुम्रपानाचा धोका किती आहे हे पटवून देणे. त्यासाठी भावनिक साद घालून प्रबोधन करणे असे उपाय अधिक प्रभावकारी असू शकतात, असे मत अभ्यासात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोनाली देशपांडे यांनी व्यक्त केले.