ETV Bharat / state

सिल्लोड : नागरिक म्हणतात खड्डे असलेले रस्तेच बरे होते - Aurangabad District Latest News

सिल्लोड-कन्नड रस्त्यावर पूर्वी खड्डेच खड्डे पडले होते, रस्त्याची चाळणी झाली होती. वाहनधारकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. मात्र आता या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. रस्ता चांगला झाल्याने वाहनधारक या रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहन चालवत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्वीचेच रस्ते बरे होते असं म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.

नागरिक म्हणतात खड्डे असलेले रस्तेच बरे होते

author img

By

Published : Jan 23, 2021, 9:32 PM IST

सिल्लोड - सिल्लोड-कन्नड रस्त्यावर पूर्वी खड्डेच खड्डे पडले होते, रस्त्याची चाळणी झाली होती. वाहनधारकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. मात्र आता या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. रस्ता चांगला झाल्याने वाहनधारक या रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहन चालवत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्वीचेच रस्ते बरे होते असं म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सिल्लोड - कन्नड रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अत्यंत संथगतीने वाहने चालवावी लागायची. यामुळे भरधाव वाहनांमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी झाले होते. मात्र आता या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. रस्ता चांगला झाल्याने, वाहनधारक देखील सुसाट वेगाने या रस्त्यांवर वाहने चालवत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

संरक्षण कठाडे नसल्याने होऊ शकतात अपघात

संरक्षण कठाडे नसल्याने होऊ शकतात अपघात

हा नवीन रस्ता चांगला मजबूत झाला आहे. मात्र हा रस्ता जमिनीपासून 8 ते 10 फूट उंच आहे. तसेच या रस्त्याच्या कडेला कुठल्याही प्रकारचे सरक्षण कठाडे बांधण्यात आलेले नाही. त्यामुळे एका छोट्याश्या चुकीमुळे देखील वाहन 10 ते 12 फूट खाली कोसळू शकते. त्यामुळे पूर्वीचाच रस्ता बरा होता, असं म्हणण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.