ETV Bharat / state

औरंगाबाद : निलंबनाची धमकी देऊन कामावर पाठवेल्या आजारी एसटी बस वाहकाचा मृत्यू - aurangabad bus conductor news

निलंबित करण्याची धमकी देऊन कामावर पाठवलेल्या आजारी एसटी बस वाहकाचा मृत्यू कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. माझी हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली असून सोबतच मधुमेह असल्याने मुंबईला पाठवू नये, अशी विनंती या वाहकाने केली होती.

sick st bus driver who was sent to work under threat of suspension died in aurangabd
औरंगाबाद : निलंबनाची धमकी देऊन कामावर पाठवेल्या आजारी एसटी बस वाहकाचा मृत्यू
author img

By

Published : Mar 4, 2021, 10:36 AM IST

औरंगाबाद - मुंबईहून ड्युटी करून परतलेल्या एसटी वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली. रंजित चव्हाण असे या वाहकाचे नाव आहे. रंजितने त्याची हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली असून सोबतच मधुमेह असल्याने मुंबईला पाठवू नये, अशी विनंती केली होती. मात्र, एसटीच्या अधिकाऱ्यांनी निलंबित करण्याची धकमी देत मुंबईला पाठवले, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

प्रतिक्रिया

विनंती करूनही पाठवले कामावर -

मुंबईला गेल्यावर दोन दिवसात तब्येतीमुळे रंजित चव्हाण परत आले. आल्यावर तब्येत खराब असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच त्यांचा कोरोना अहवालही पॉझिटीव्ह आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. निलंबित करण्याची धमकी देऊन कामावर पाठवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. इतकेच नाही, तर मृत रंजित यांच्या कुटुंबाची जबाबदारी परिवहन विभागाने घ्यावी, तसेच मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका मृताच्या नातेवाईकांना केली घेतली होती.

रात्री उशिरा झाले अंत्यसंस्कार -

रंजित चव्हाण यांचा अंत्यविधी न करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतल्यावर परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर रंजित यांच्या कार्यकाळातील सर्व आर्थिकबाबी आणि कोविड विमा मिळण्यासाठी तातडीने पाऊल उचलण्याची शास्वती देण्यात आली. त्यांनतर रंजित यांच्यावर रात्री उशिरा अंत्यविधी करण्यात आला.

हेही वाचा - राष्ट्रवादीची अहमदनगर महापालिकेत भाजपसोबतची मैत्री कायम; स्थायी निवडणुकीसाठी भाजपकडून पाठिंबा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.