ETV Bharat / state

एकनाथ खडसे यांनी शिवसेनेत यावं, मी मध्यस्थी करेन; शिवसेना आमदारांचे वक्तव्य - भाजपाचा बाहुबली

अब्दुल सत्तार यांनी भाजपा नेते एकनाथ खडसे यांना 'भाजपाचा बाहुबली' अशी उपमा दिली. त्यांनी भाजपा सोडून आता शिवसेनेत यायला हवे आम्ही त्यांचे स्वागत करू, असे देखील सत्तार म्हणाले.

औरंगाबाद
औरंगाबाद
author img

By

Published : Sep 5, 2020, 7:01 PM IST

औरंगाबाद - कटप्पाने बाहुबलीला का मारले, हे आता सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे खडसे यांचे काय झाले, ते नव्याने सांगायला नको, असे म्हणत शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपा नेते एकनाथ खडसे यांना 'भाजपाचा बाहुबली' अशी उपमा दिली. त्यांनी भाजपा सोडून आता शिवसेनेत यायला हवे आम्ही त्यांचे स्वागत करू, असे देखील अब्दुल सत्तार म्हणाले.

औरंगाबाद

मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो, म्हणूनच मला बाजूला करण्यात आले. मात्र, नाथाभाऊ कधी संपणार नाही, असे वक्तव्य भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी केले होते. त्यावर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी खडसे यांच्यावर भाजपामध्ये खरंच अन्याय झाला आहे. त्यांच्यामुळे शिवसेना आणि भाजपा युती तुटली. आता खडसेंनी आमच्याकडे यावे, त्यांच्यासारख्या नेत्यांची शिवसेनेला मदत होईल, असे सत्तार म्हणाले.

हेही वाचा - वर्ध्यात रागाच्या भरात रुग्णवाहिका पेटवली; चालकावरही चाकूने हल्ला

एकनाथ खडसे कधी संपणार नाहीत. राजकारणात एखादा अपघात होतो आणि त्या अपघाताने एखादा माणूस मागे पडतो. मात्र, खडसे यांच्यावर भाजपामध्ये खरंच अन्याय होत आहे. त्यांचे भवितव्य चांगले आहे, त्यांनी शिवसेनेत यावे, आम्ही मुख्यमंत्र्यांना त्यांच्याबाबत निश्चित बोलू. त्यांनी ओबीसी समाजाला घेऊन शिवसेनेत सामील व्हावे, त्याचा परिणाम निश्चितच चांगला होईल. एकनाथ खडसे आमचे राजकीय नेते आहेत आणि अशा परिस्थितीत शिवसेनेला त्यांचा फायदाच होईल, असे देखील अब्दुल सत्तार म्हणाले.

दरम्यान, एकाच कार्यक्रमासाठी आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खडसे यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. एकनाथ खडसे यांची नाराजी असेल ती चर्चा करून दूर करू. पक्षामध्ये वेळोवेळी बदल केले जातात, गरजेनुसार निर्णय घेतले जातात, आम्ही एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा करू, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

हेही वाचा - पुण्याच्या जम्बो कोविड रुग्णालयामध्ये अनेक त्रुटी, महापौरांची कबुली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.