ETV Bharat / state

शिवसेनेने राष्ट्रवादी समोर गुडघे टेकले, खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप - पालकमंत्री सुभाष देसाई

उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी कोणत्याही परिस्थितीत क्रीडा विद्यापीठ औरंगाबाद येथेच होणार असुन त्यासाठी जागाही निश्चित झालेली असल्याचे आश्वासन केले होते. मग क्रीडा विद्यापीठ पुणे येथे स्थलांतरीत करुन मराठवाड्यावर नेहमीप्रमाणे अन्याय करण्यात आल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

Allegation of MP Imtiaz Jalil
शिवसेनेने राष्ट्रवादी समोर गुडघे टेकले
author img

By

Published : Jul 27, 2021, 10:01 AM IST

औरंगाबाद - आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुणे येथे होणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटर द्वारे दिली. यावर खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी समोर शिवसेनेने गुडघे टेकले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली राज्य शासनाने क्रीडा विद्यापीठ पुण्याला स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला असल्याचा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

क्रीडा विद्यापीठ औरंगाबादेत होते प्रस्तावित -

औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार इम्तियाज जलील यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ औरंगाबादलाच करण्यात यावे इतरत्र हलविण्यात येवु नये असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी कोणत्याही परिस्थितीत क्रीडा विद्यापीठ औरंगाबाद येथेच होणार असुन त्यासाठी जागाही निश्चित झालेली असल्याचे आश्वासन केले होते. मग क्रीडा विद्यापीठ पुणे येथे स्थलांतरीत करुन मराठवाड्यावर नेहमीप्रमाणे अन्याय करण्यात आल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

विद्यापीठ औरंगाबादलाच करा -

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ औरंगाबाद जवळ करोडी येथे मंजूर झाले होते. गंगापूर तालुक्यातील वाळूज येथे क्रीडा सुविधा उभारल्या जाणार होत्या. जे औरंगाबादला मंजुर केले होते ते पुण्याला चालले आहे. क्रीडा विद्यापीठ औरंगाबाद येथे व्हायला पाहिजे. चार वर्षे सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करुन करोडी येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जागा निश्चित करण्यात आली होती. मराठवाड्याचे सर्व कार्यालये इतरत्र हलवले जात आहेत. क्रीडा विद्यापीठाबाबत तसे होवु नये अशी खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला विनंती केली. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ औरंगाबादला प्रस्तावित झाले होते जागाही उपलब्ध आहे मग इतरत्र हलविण्याचा प्रश्नच येत नाही, विद्यापीठ औरंगाबादलाच करावे अशी आग्रहाची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला केली आहे.

तर मराठवाड्याला न्याय मिळणार कधी -

२०१४ साली महाराष्ट्रात भाजपा व शिवसेनाचे सरकार होते. त्यावेळी सुध्दा औरंगाबादवर अन्याय करण्यात आला होता. औरंगाबादला मंजुर झालेले एआयआयएमएस इन्सटिट्युट तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरला स्थलांतरीत केले होते. इंटरनॅशनल इन्सटिट्युट ऑफ प्लानिंनग अ‍ॅण्ड आर्कीटेक्चर ही मंजुर झाले होते. परंतु, त्यावर सुध्दा आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. आणि आता महाविकास आघाडी सरकार देखील अन्याय करणार असेल तर मराठवाड्याला न्याय मिळणार कधी असा प्रश्न खासदार जलील यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी समोर शिवसेनेने टेकले गुडघे -

औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे ५ आमदार व २ मंत्री असतांना सुध्दा औरंगाबादेत प्रस्तावित असलेले व जागा सुध्दा निश्चित झालेले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ शिवसेनेच्या नाकाखालुन पुण्याला पळविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे. ही बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असुन महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे महत्व किती आहे, ते संपुर्ण महाराष्ट्राच्या जनतेसमोर आता उघड झालेले आहे. पुणे शहर हे सुरुवातीपासुनच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असुन तेथे अगोदर पासुनच अद्यावत बालेवाडी स्टेडिअम आहे. तसेच या व्यतिरिक्त क्रीडा क्षेत्रासाठी विविध प्रकारचे सोयीसुविधा उपलब्ध असतांना सुध्दा राष्ट्रवादीने राजकीय फायदा घेत पुणे येथे क्रीडा विद्यापीठ पळविले असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.