ETV Bharat / state

शिवसेनेकडून विधान परिषद निवडणुकीसाठी अंबादास दानवेंना उमेदवारी - उमेदवारी

पक्षीय बलाबल पाहता युतीच्या उमेदवाराचा विजय पक्का मानला जात असला, तरी अपक्षांवर उमेदवारांची भिस्त असणार आहे.

शिवसेनेकडून विधान परिषद निवडणुकीसाठी अंबादास दानवेंना उमेदवारी
author img

By

Published : Jul 29, 2019, 6:21 PM IST

औरंगाबाद - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेतर्फे शिवसेना जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षीय बलाबल पाहता युतीच्या उमेदवाराचा विजय पक्का मानला जात असला, तरी अपक्षांवर उमेदवारांची भिस्त असणार आहे.

अंबादास दानवे, शिवसेना जिल्हाध्यक्ष

काँग्रेस पक्षातून अद्याप कोणत्याही अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली नाही. तरी, अपक्ष उमेदवारांना सोबत घेऊन विजय मिळवला येईल, असा विश्वास काँग्रेसला आहे. मात्र, असे असले तरी पैशांच्या घोडेबाजारात टिकणाऱ्या उमेदवाराला काँग्रेस उमेदवारी जाहीर करणार असण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आमदार निवडीची प्रक्रिया 19 ऑगस्टला पार पडणार आहे.

पक्षीय बलाबल

  • काँग्रेस 167
  • भाजप - 159
  • शिवसेना - 139
  • राष्ट्रवादी - 83
  • एमआयएम - 27
  • अपक्ष - 41

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आमदारकीच्या निवडणुकीत पैशांचा होणारा घोडेबाजार काही नवीन नाही. त्यामुळे या घोडेबाजारात टिकणारा उमेदवार काँग्रेस शोधत आहे. या निडवणुकीत अपक्ष आणि एमआयएम पक्षाच्या मतदारांच्या भूमिकेवर निकाल अवलंबून असणार आहे. मात्र, पक्षीय बलाबल पाहता आपला विजय निश्चित असल्याचा दावा शिवसेना उमेदवार अंबादास दानवे यांनी केला आहे.

Intro:स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेतर्फे अंबादास दानवे याना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षीय बलाबल पाहता युतीच्या उमेदवाराचा विजय पक्का मानला जात असला तरी अपक्षांवर उमेदवारांची भिस्त असणार आहे.

Body:काँग्रेस पक्षातून अद्याप अधिकृत कोणत्याही उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली नसली तरी अपक्ष उमेदवारांना सोबत घेऊन विजय मिळवला येईल असा विश्वास काँग्रेसला आहे. अस असलं तरी पैश्यांच्या घोडेबाजारात टाकणाऱ्या उमेदवाराला काँग्रेस उमेदवारी जाहीर करणार असल्याची शक्यता आहे.

Conclusion:स्थानिक स्वराज्य संस्था आमदार निवडीची प्रक्रिया 19 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेने औरंगाबाद शिवसेना जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. औरंगाबाद आणि जालना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस 167, भाजप - 159, शिवसेना - 139, राष्ट्रवादी - 83, एमआयएम - 27, अपक्ष - 41 अस पक्षीय बलाबल आहे. शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली असली तरी काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आमदारकीच्या निवडणुकीत पैश्यांची होणार घोडेबाजार काही नवीन नाही. त्यामुळे या घोडेबाजारात टिकणारा उमेदवार काँग्रेस शोधत आहे. या निडवणुकीत अपक्ष आणि एमआयएम पक्षाच्या मतदारांच्या भूमिकेकडे निकाल अवलंबून आहे. मात्र पक्षीय बलाबल पाहता आपला विजय निश्चित असल्याचा दावा शिवसेना उमेदवार अंबादास दानवे यांनी केलाय.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.