ETV Bharat / state

आजपासून कन्नड तालुक्यातील शाळांना सुरुवात; चिकलठाण शाळेत फक्त ३२ विद्यार्थ्यांची उपस्थिती - Chikalthana School open news

कोरोनाच्या भीतीपोटी अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याबद्दलचे संमतीपत्र भरून दिलेले नाही. त्यामुळे, प्रत्यक्ष किती विद्यार्थी शाळेत येतात, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथील जिल्हा परिषद शाळेचा आढावा घेतला असता, शाळेत फक्त ३२ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Number of students Chikalthan School
चिकलठान शाळेत फक्त ३२ विद्यार्थ्यांची उपस्थिती
author img

By

Published : Nov 23, 2020, 4:17 PM IST

Updated : Nov 23, 2020, 5:24 PM IST

कन्नड (औरंगाबाद) - आजपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. शाळांमध्ये फक्त नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरणार आहे. कोरोनाच्या भीतीपोटी अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याबद्दलचे संमतीपत्र भरून दिलेले नाही. त्यामुळे, प्रत्यक्ष किती विद्यार्थी शाळेत येतात यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथील जिल्हा परिषद शाळेचा आढावा घेतला असता, शाळेत फक्त ३२ विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली.

माहिती देताना चिकलठाण जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य

विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना वर्गात बसवण्यात आले. यावेळी खबरदारी म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक बाक सोडून विद्यार्थी बसवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आधी एका बाकावर दोन विद्यार्थी बसत होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांना एकटे बसावे लागल्याने त्यांच्यात उदासीनता दिसून आली. तसेच, तालुक्यातील काही शाळा 25 तारखेला सुरू होणार आहेत. काही शिक्षकांची कोरोना चाचणी व्हायची असल्याने ते शाळेत उपस्थित राहू शकले नाही.

हेही वाचा - औरंगाबादमध्ये सायकल खरेदीसाठी 8 दिवसांची प्रतीक्षा यादी, कोरोनाचा प्रभाव

Last Updated : Nov 23, 2020, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.