पैठण - नुकतेच रोहयो मंत्री संदीपान भुमरे आणि कृषी विभागाचे सचिव एकनाथ दवले यांनी संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या 62 एकर जागेची पाहणी केली.
काय आहे सिट्रस इस्टेट प्रकल्प
20 कोटी च्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 3 कोटी 10 लाख रुपयाची मंजुरी मिळाली असल्याची माहिती रोहयो मंत्री भुमरे यांनी दिली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निर्यातक्षम वाणाची कलमे पुरविणे, लागवडीत इंडो-इस्रायल तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, शेतकऱ्यांसाठी मृद, पाणी, माती परीक्षणासाठी या ठिकाणी अद्ययावत प्रयोगशाळांची उभारणी करणे, प्रशिक्षण देणे या बाबींचा समावेश करण्यात येईल. सभासदांसाठी शुल्क आकारणी आणि एकूण व्यवस्थापनासाठी कार्यकारी समितीची स्थापना केली जाणार आहे. 62 एकर जागेच्या या परिसरात प्रयोगशाळा, कार्यशाळा, पॉलिहाऊस उभारणीचे काम प्राथमिक कार्य कृषी विभागाच्या नर्सरीमध्ये सुरू होईल. कीटकशास्त्रज्ञ, मातीपरीक्षण तज्ज्ञ, वनस्पती रोगशास्त्र तज्ज्ञ, फलोत्पादन तज्ज्ञ, तांत्रिक सहायक, वाहन चालक, संगणक चालक, शिपाई, रखवालदार असे मनुष्यबळ या ठिकाणी कामी येणार आहे.
हेही वाचा - यंत्रणेचे कौतुक करावे तेवढे थोडे, पोषण आहार म्हणून शाळेत पाठवले पशुखाद्य..!
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी डॉक्टर भगवान कापसे,फळ संशोधनकेंद्राचे एम.बी.पाटील,मोसंबी संशोधनकेंद्र बदनापूरचे संजय पाटील, औरंगाबाद जिल्हा दुध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे,संभाजी सव्वाशे फळ रोप वाटीका पैठणचे गायकवाड हे उपस्थित होते.
हेही वाचा - कोरोना प्रतिबंधक बीएमसी महिला मार्शलला मारहाण