ETV Bharat / state

Terrible Explosion In Nagapur : बंद घरात झालेल्या भीषण स्फोटात तरुण गंभीर जखमी; नागापूर गावातील नागरिकांना हादरा - Sameer Shaikh Salim injured in blast

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नागापूर गावात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. आज एका टिनशेडच्या घरात झालेल्या स्फोटात समीर शेख सलीम नावाचा एक व्यक्ती जखमी झाला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत.

Terrible Explosion In Nagapur
Terrible Explosion In Nagapur
author img

By

Published : Jun 21, 2023, 5:26 PM IST

Updated : Jun 21, 2023, 7:20 PM IST

पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया माहिती देतांना

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नागपुरात मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास एका व्यक्तीच्या घरात भीषण स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण गाव हादरले. स्फोटाची तीव्रता एवढी होती की घराचा लोखंडी पत्रा वाकला. या स्फोटामुळे घरात असलेला ३५ वर्षीय शेख समीर शेख सलीम हा तरुण ऐंशी टक्क्यांहून अधिक जखमी झाला. स्फोटाचे कारण स्पष्ट न झाल्याने स्थानिक पोलिसांचा गोंधळ उडाला असून छत्रपती संभाजीनगर येथून बॉम्ब शोधक व निकामी पथकाला पाचारण करण्यात आले.

नागपूर येथे समीर शेख सलील शेख हा गॅस स्टोव्हवर काम करत असताना अचानक स्फोट झाला. यात समीर शेख गंभीर जखमी झाला आहे. एका पत्र्याच्या खोलीत अचानक स्फोट झाला. त्यात पत्र्याचा काही भाग उडाला. तिथे असलेल्या संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्या आहेत - पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया

नागापूर गाव हादरले : कन्नड तालुक्यातील नागापूरमध्ये विस्फोटक वस्तूचा स्फोट झाला. त्यात समीर शेख सलीम शेख गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. विस्फोटाची तीव्रता मोठी असल्यामुळे नागापूर गाव हादरले, या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला असून नेमके कोणते केमिकल होते याबाबत तपास सुरू केल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली.

पत्र्या शेडमध्ये स्फोट : जखमी समीर शेखबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. त्याचे वडील गावात फळे विकतात. नागापूर हे अंदाजे पाच हजार लोकवस्तीचे गाव आहे. समीर शेख हे या गावात फळविक्रेते आहेत. त्यांनी घराच्या मागे पत्र्याचे शेड बांधले आहे. नागापूरच्या सरपंच सुरेखा तायडे म्हणाल्या की, दरवाजा बंद केल्यानंतर या शेडमध्ये काय करतात हे कोणालाच कळत नाही.

समीर शेख घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल : दुपारी एकच्या सुमारास समीर दार बंद करून शेडमध्ये बसला होता, तेव्हा स्फोट झाला. या आवाजाने आजूबाजूचे ग्रामस्थ धावून आले. स्फोटामुळे पटारिया यांच्या शेडचा लोखंडी दरवाजा वाकला. गंभीर जखमी समीर शेख याला गावकऱ्यांनी बाहेर काढले. त्याचा चेहरा विद्रूप झाला होता. शरीराचा ऐंशी टक्क्यांहून अधिक भाग जळाला होता. त्यांना खासगी वाहनातून औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक कोमल शिंदे, उपनिरीक्षक सतीश बडे, दराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांना विहिरीसाठी जिलेटिन कांड्या फोडल्यासारखी माती विखुरलेली आढळून आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

बॉम्बशोधक पथकाला पाचारण : स्फोटामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नेमका स्फोट कशामुळे झाला? स्फोटामुळे खोल खड्डा तयार झाला आहे, त्या विवरात नेमके काय दडले आहे? गॅस टाकीच्या स्फोटातून तुम्ही कसे वाचलात? जखमी समीर शेख नेमका कोणता प्रयोग करत होता? समीर शेख यांनी औषधी वनस्पतींवर प्रयोग केला तेव्हा पाने किंवा कंद आढळले नाहीत. फक्त लिंबू कापले होते. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, लोखंडी दरवाजा वाकला होता. या सर्व प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत राहिल्याने बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Last Updated : Jun 21, 2023, 7:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.