ETV Bharat / state

Maratha Reservation : मराठ्यांच्या अस्मितेची लढाई आझाद मैदानातील आंदोलनात हजारोंच्या संख्येने सामील व्हा - सकल मराठा समाज

खासदार छत्रपती संभाजीराजे ( Chhatrapati Sambhajiraje ) 26 फेब्रुवारीला मुंबई येथे आमरण उपोषणला बसणार आहेत. मराठा समाजासाठी ही अस्मितेची लढाई असून रायगड जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाचे रायगड ( Sakal Maratha Samaj Raigai ) जिल्हाध्यक्ष विनोद साबळे यांनी केले.

Maratha Reservation
मराठा आरक्षण
author img

By

Published : Feb 21, 2022, 7:08 PM IST

रायगड - सकल मराठा समाजाला आरक्षण ( Maratha Reservation ) मिळवण्यासाठी लाखोंच्या संख्येने शांततेत मोर्चे निघाले तरीदेखील सरकारने आरक्षण दिले नाही. आता खासदार छत्रपती संभाजीराजे ( Chhatrapati Sambhajiraje ) 26 फेब्रुवारीला मुंबई येथे आमरण उपोषणला बसणार आहेत. मराठा समाजासाठी ही अस्मितेची लढाई असून रायगड जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाचे रायगड ( Sakal Maratha Samaj Raigai ) जिल्हाध्यक्ष विनोद साबळे यांनी आज पेण येथे बोलताना केले.

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी छत्रपती संभाजीराजे स्वतः 26 फेब्रुवारीला मुंबई येथील आझाद मैदान येथे आमरण उपोषण करण्यासाठी बसणार आहेत. या उपोषणाला रायगड जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी तयारी करण्यासाठी रायगड जिल्ह्याची बैठक आज पेण येथील मराठा समाज भवन (हॉल) येथे संपन्न झाली.

या बैठकीला उरण सकल मराठा समाज अध्यक्ष संतोष पवार, खालापूर तालुकाध्यक्ष अमित यादव, पनवेल तालुकाध्यक्ष ह.भ.प. मारुती महाराज पाटील, रायगड जिल्हा समन्वयक हरीश बेकावडे, मंगेश दळवी, अलिबाग तालुकाध्यक्ष नरेश सावंत, पेण शहर अध्यक्ष प्रवीण बैकर, अण्णा पार्टे, पी.टी.शिंदे, शंकर मानकवळे, के.जी.पाटील, मारुती भानुस्कर, नथुराम जागडे, काशिनाथ शिगवण, प्रकाश जाधव, ह.भ.प.पांडुरंग पाटील, मयूर सावळे, सागर पवार, श्रीकांत जाधव, सचिन पवार, संतोष जाधव, कमलाकर साळुंके, दिलीप शेडगे, सुनील सावळे यांच्या सह शेकडो मराठा समाज बांधव उपस्थित होते.

हेही वाचा - Aaditya Thackeray criticized : फडणवीसांना सत्ता गेल्यापासून नैराश्य, त्यांच्यावर बोलून मी माझा वेळ वाया घालवणार नाही : आदित्य ठाकरे

छत्रपती संभाजी राजेंचे विचार पटवून द्या -

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष विनोद साबळे म्हणाले कि, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार टाळाटाळ करत आहे. या आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांना मुंबई येथे उपोषणाला बसावे लागते ही शोकांतिका आहे. सरकारला मराठा समाजाची ताकद दाखवून देण्यासाठी लाखो मराठे 26 फेब्रुवारीला मुंबईतील आझाद मैदानात धडकणार आहेत. रायगड जिल्ह्यातून हजारो मराठ्यांनी आपली उपस्थिती लावली पाहिजे. यासाठी उपस्थित कार्यकर्त्यांनी खेडोपाडी जाऊन छत्रपती संभाजीराजे यांचे विचार पटवून द्यावे. समाजातील तरुण पिढीने या लढ्यात स्वतःला झोकून देण्याचे आवाहन विनोद साबळे यांनी यावेळी केले.

समाजाच्या आरक्षणासाठी आत्मदहन करण्याची वेळ आली, तर सर्वात पुढे मी असेन असे रायगड जिल्हा समन्वयक हरीश बेकावडे यांनी म्हटले. यावेळी उरण सकल मराठा समाज अध्यक्ष संतोष पवार, खालापूर तालुकाध्यक्ष अमित यादव, पनवेल तालुकाध्यक्ष ह.भ.प. मारुती महाराज पाटील यांनी देखील आपले विचार मांडले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.