औरंगाबाद - सर्वत्र भाऊबीज उत्साहात साजरी ( Bhaubij celebrated with enthusiasm ) केली जात आहे. त्यात जिल्ह्यात भाऊबिजेच्या दिवशी रेड्यांची सगर काढण्याची अनोखी परंपरा ( Puja of Redya on Bhaubije day ) आहे. त्यानुसार आज राजबाजार भागात गवळी समाजातर्फे दरवर्षीप्रमाणे रेड्यांना, म्हशींना सजवून त्यांची मिरवणूक काढण्यात आली.
प्राण्यांविषयी कृतज्ञता केली जाते व्यक्त... कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता. त्या काळापासून अनोखी प्रथा पाळली जाते. भाऊबिजेच्यादिवशी रेड्यांची पूजा ( Puja of Redya on Bhaubije day ) केली जाते. घरातील जनावरांची पूजा व्हावी यासाठी त्यांना सजवून त्यांची पूजा केली जाते. भाऊबीज हा सण गवळी समाजासाठी महत्त्वाचा असतो. यादिवशी गवळी समाज रेड्यांची आणि म्हशींची मिरवणूक काढत ( Procession of redis ) असते. औरंगाबादच्या गौळीपुऱ्यात गेल्या 108 वर्षांपासून ही परंपरा पाळली जाते.
रेड्याची पूजा - गवळी समाज दरवर्षी सगरसाठी मोठी तयारी करतो. म्हैस हे लक्ष्मीचे रूप, तर रेडा हा यमाचे वाहन असल्याचे मानले जाते. रेड्याची पूजा केल्याने नवीन वर्षात कुठल्याही अडचणी येत नाहीत, अशी धारणा असल्याने मोठ्या उत्साहात रेड्यांची, म्हशींची सगर काढली जाते. आधी गवळी समाज या सगरमध्ये सहभागी व्हायचा. मात्र, आता सर्वधर्मीय दूध व्यवसाय करणारे व्यावसायिक या सगरमध्ये सहभागी होत असतात.