Burning Car : धावत्या कारने अचानक घेतला पेट, सुदैवाने जीवितहानी नाही - सुदैवाने जीवितहानी नाही
लग्नसमारंभ आटोपून घराकडे परतत असताना धावत्या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी (दि. 25 एप्रिल) सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान औरंगाबाद नाशिक महामार्गावर शिऊरजवळ घडली आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.
वैजापूर (औरंगाबाद) - लग्नसमारंभ आटोपून घराकडे परतत असताना धावत्या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी (दि. 25 एप्रिल) सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान औरंगाबाद नाशिक महामार्गावर शिऊरजवळ घडली आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, वाहन चालक, मालक मयूर दत्तू औटे ( रा.विरंगाव, ता. वैजापूर) हा स्वतःच्या चारचाकीने मित्र सागर तुपे व त्याच्या आई व पत्नीला घेऊन मनोली येथे लग्नसमारंभासाठी आला होता. लग्न आटोपून परतत असताना शिऊर गावाजवळ चारचाकीत अचानक वायर जळल्याच दुर्गंध येऊ लागला. त्यामुळे मयूर औटे याने आपले वाहन रस्त्याच्या कडेला उभे करत बोनट उडले. त्यावेळी वाहनाने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत वाहनातील सर्वजण बाहेर पडल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
हेही वाचा - Aurangabad Freestyle : व्हाट्सअॅप स्टेटसवरून दोन गटात वाद, हाणामारीत एक गंभीर तर दोन जखमी