औरंगाबाद - जाधववाडी येथून आंबेडकर नगरकडे येत असताना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून एकावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आंबेडकर नगर गल्ली नं.8 येथील रहिवासी शुभम लोखंडे (वय 22) हा मित्र हर्षद देविदास गडवे हे जाधव वाडी येथे काम करतात. दरम्यान काम करून जाधववाडी येथून आंबेडकर नगरकडे परतत असताना रेणुका माता मंदिराजवळ दुचाकीचा अपघात झाला. नागरिकांनी त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान डॉक्टरांनी शुभम वानखेडे याला तपासून मृत घोषित केले. तर हर्षद गडवे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात कसा झाला हे अद्याप समजू शकले नसून या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
औरंगाबाद : रेणुकामाता मंदिराजवळ अपघात;एक जण जागीच ठार
जाधववाडी येथुन आंबेडकर नगर येथे येत असताना रेणुका माता मंदिराजवळ अपघात झाला यात एक जण जागीच ठार झाला असून एकावर उपचार सुरू आहे.