ETV Bharat / state

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात मित्र पक्षाचा सेनेला धोका - औरंगाबाद पश्चिम मतदार संघ

जातीय समीकरणांच्या बाबतीत संमिश्र असा हा मतदारसंघ आहे. त्यामुळेच शिवसेनेसाठी शहरातील तीन मतदार संघापैकी हा सर्वात सुरक्षीत मतदारसंघ आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमकडून अनेक जण या मतदारसंघातून आपले नशीब आजमावण्यासाठी इच्छुक आहेत.

औरंगाबाद पश्चिम मतदार संघात मित्र पक्षाचा सेनेला धोका
author img

By

Published : Sep 28, 2019, 2:10 PM IST

Updated : Sep 28, 2019, 8:01 PM IST

औरंगाबाद- शहरातील औरंगाबाद पश्चिम हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. गेल्या दोन टर्मपासून इथे शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व टिकून आहे. शिवसेनेचे संजय शिरसाट गेल्या दशकापासून येथील आमदार आहेत. मात्र, यावेळी सेनेला मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात मित्र पक्षाचा सेनेला धोका

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात शहरासह अनेक गावांचाही समावेश आहे. यात सातारा परिसर, पंढरपूर, माळीवाडा पासून ते कांचनवाडी, वडगाव कोल्हाटी या गावांसह कामगार वस्ती असलेल्या बजाजनगरचाही समावेश आहे. 2014 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप वेगवेगळी लढली होती. त्यावेळी दोघांमध्येच खरी लढत पाहायला मिळाली. यात शिवसेनेने बाजी मारली तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार मधुकर सावंत होते. एमआयएमने देखील माजी मंत्री गंगाधर गाडे यांना या मतदारसंघातून उभे केले होते. मात्र, औरंगाबाद शहरातल्या तीनपैकी या मतदारसंघात एमआयएमला सर्वात कमी मते मिळाली होती.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना या मतदारसंघातून लीड मिळाली होती. जातीय समीकरणांच्या बाबतीत संमिश्र असा हा मतदारसंघ आहे. त्यामुळेच शिवसेनेसाठी शहरातील तीन मतदारसंघापैकी हा सर्वात सुरक्षित मतदारसंघ आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमकडून अनेकजण या मतदारसंघातून आपले नशीब आजमावण्यासाठी इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत एमआयएमने या मतदारसंघातून अधिक मत मिळावेत म्हणून प्रकाश आंबेडकर आणि ओवैसींची सभा याच मतदारसंघातील मैदानावर घेतली होती. परंतू त्याचा प्रभाव पडू शकला नाही. अनेक जण या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. भाजपकडून राजू शिंदे, एमआयएम कडून अरुण बोर्डे, काँग्रेसकडून जितेंद्र देहाडे इच्छुक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी या मतदारसंघामध्ये कामेही सुरू केली आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला या मतदारसंघातून कसं मतदान झाले

पक्ष उमेदवाराचे नाव मते
एमआयएम इम्तियाज जलील 71239
शिवसेना चंद्रकांत खैरे 77274
अपक्ष हर्षवर्धन जाधव 38087
काँग्रेस सुभाष झाबड 15595

लोकसभेला शिवसेना-भाजपा एकत्र लढली होती. विधानसभा निवडणुकीतही शिवसेना-भाजप एकत्र लढेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे इथे शिवसेनेचे पारडे जड राहील असा अंदाज आहे. पण, शिवसेना-भाजप जर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले तर मात्र इथे शिवसेना-भाजप विरुद्ध एमआयएम अशी तिहेरी लढत पहायला मिळू शकते.

2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली.

पक्ष उमेदवाराचे नाव मते
शिवसेना संजय शिरसाठ 61 हजार 282
भाजपा मधुकर सावंत 54 हजार 355
एमआयएम गंगाधर गाडे 35 हजार 348

विद्यमान आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात अनेकांनी बंडाच निशाण उगारले आहे. पश्चिम मतदार संघात विकास कामे झाली नसल्याचा दावा इच्छुकांनी केला आहे. त्यात भाजपच्या राजू शिंदेंचे नाव आघाडीवर आहे. युती झाली नाही तर भाजपकडून नाही तर अपक्ष लढणार, असा पवित्रा शिंदे यांनी घेतला आहे. गेल्या तीन वर्षांपासून मतदारसंघात राज्य सरकार कडून निधी आणून कामे केल्याचा दावा राजू शिंदे यांनी केला आहे. तर विद्यमान आमदारांनी मतदारसंघात कामे केली नसल्याचा आरोपसुध्दा ईच्छुक उमेदवारांनी केला आहे. विद्यमान आमदारांनी मात्र इतर उमेदवारांचे आरोप फेटाळून लावलेत. आपल्याला शक्य असलेली सर्व कामे केल्याचा दावा त्यांनी केला आहे. सातारा- देवळाई परिसरात पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यास कमी पडल्याचे मात्र संजय शिरसाठ यांनी मान्य केले आहे.

लोकसभेचा निकाल पाहता ईथे शिवसेनेचे पारडे जड मानले जाते. या मतदारसंघात 2014 ची विधानसभा निवडणूक सेना-भाजप विरुद्ध एमआयएम, वंचित आघाडी अशीच पाहायला मिळाली होती. शेवटी काँग्रेसला किती मते मिळतात आणि शिवसेनेला मिळणारी दलित समाजाची मते आपल्याकडे खेचण्यात वंचित-एमआयएमला किती यश मिळते, यावर या मतदारसंघाचा निकाल अवलंबून असेल. बड्या राजकीय उमेदवारांच्या मतविभाजनात नेमके कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Intro:औरंगाबाद शहरातील एक असलेला मतदार संघ म्हणजे औरंगाबाद पश्चिम. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. गेल्या दोन टर्मपासून इथं शिवसेना निर्विवाद बाजी सत्ता टिकून आहे. शिवसेनेचे संजय शिरसाट गेल्या दशकापासून आमदार आहेत. मात्र यावेळी सेनेला मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या बंडखोरीचा फटका बसण्याची चिन्ह आहे.Body:औरंगाबाद पश्चिम मतदार संघ शहरात असला तरी शहरा बाजूचे अनेक गावे या मतदारसंघांमध्ये आहेत जसं वाढलेल्या शहर सातारा परिसर, पंढरपूर, माळीवाडा पासून ते कांचनवाडी पर्यंत अशी अनेक गावही या मतदारसंघात येतात . 2014 च्या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपा या मतदारसंघातून वेगळी लढली होती. आणि या दोघांमध्येच खरी लढत पाहायला मिळाली. यात शिवसेनेने बाजी मारली तर दुसऱ्या क्रमांकावर ती भाजपाचे उमेदवार मधुकर सावंत होते. एमआयएमने देखील माजी मंत्री गंगाधर गाडे यांना या मतदारसंघातून उभं केलं होतं. मात्र औरंगाबाद शहरातल्या तीनही जागेमध्ये एमआयएममला सर्वात कमी मते या मतदारसंघात मिळाली होती. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना या मतदारसंघातून पहिल्यांदा चंद्रकांत खैरे यांना लीड मिळाली होती जातीय समीकरणांमध्ये संमिश्र असा हा मतदार संघ आहे. त्यामुळेच शिवसेनेला शहरातील तीन मतदार संघातील 2019 च्या विधानसभा निवडणुकी साठी हा सर्वात सेफ मतदारसंघ आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम कडून अनेक जण या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावण्यासाठी इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएमने या मतदार संघातून अधिक मत मिळावेत म्हणून प्रकाश आंबेडकर आणि ओबीसींची सभा याच मतदारसंघातील मैदानावर घेतली होती .तरी देखील शिवसेनेला अधिक मते मिळाली आहेत. एम एमआयएमचे अनेक नेते देखील या मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत यात सर्वात आघाडीवरचं नाव म्हणजे भाजप कडून राजू शिंदे, एमआयएम कडून अरुण बोर्डे. काँग्रेस कडून जितेंद्र देहाडे इच्छुक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी या मतदारसंघांमध्ये कामही सुरू केलंय.
Conclusion:लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला या मतदार संघातून कसं मतदान झालं यावर एक नजर टाकूया*

चंद्रकांत खैरे शिवसेना 77274 मतं

इम्तियाज जलील एमआयएम 71239 मते

अपक्ष उमेदवार हर्ष7 जाधव यांना 38087 मतं

सुभाष झाबड 15595 मते मिळाली .

लोकसभेला शिवसेना-भाजपा एकत्र लढली होती. विधानसभा निवडणुकीतही शिवसेना-भाजप एकत्र लढेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे इथे शिवसेनेचे पारडे जड राहील. पण शिवसेना भाजपा जर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले तर मात्र इथे शिवसेना-भाजपा विरुद्ध एम आय ॲम असे तिहेरी लढत पाहायला मिळू शकते.

2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली.

संजय शिरसाठ शिवसेना यांना 61 हजार 282 मते मिळाली आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले

भाजपाच्या मधुकर सावंत यांना 54355 मतं मिळाली ते दुसऱ्या स्थानावर होते..

एम आय एम चे तत्कालीन उमेदवार गंगाधर गाडे यांना 35 हजार 348 मतं मिळाली.

विद्यमान आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात अनेकांनी बंडाच निशाण उगारल आहे. पश्चिम मतदार संघात विकास काम झालं नसल्याचा दावा इच्छुकांनी केलाय. त्यामध्ये आघाडीवर नाव आहे ते भाजपच्या राजू शिंदे यांच. युती झाली नाही तर भाजप कडून नाही तर अपक्ष असा पवित्रा राजू शिंदे यांचा आहे. गेल्या तीन वर्षांपासून मतदार संघात राज्य सरकार कडून निधी आणून काही काम केल्याचा दावा राजू शिंदे यांनी केलाय.

Byte - राजू शिंदे - भाजपचे इच्छुक उमेदवार (काचेसमोर उभं राहून केलेला बाईट)

विद्यमान आमदारांनी मात्र इतर उमेदवारांचे आरोप फेटाळून लावलेत. आपल्याला शक्य असलेली काम केली असून सातारा - देवळाई परिसरात पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यास कमी पडल्याचं संजय शिरसाठ यांनी मान्य केलं.

संजय शिरसाठ - विद्यमान आमदार (चष्मा घातलेला बाईट)

2019 च्या लोकसभेच्या निकाल पाहता शिवसेनेचे पारडे इथे जड मानले जाते. या मतदार संघात 2014 ची विधानसभा निवडणूक सेना-भाजपा विरुद्ध एम आय एम, वंचित आघाडी अशीच पाहायला मिळणार मिळाली होती. शेवटी काँग्रेसला किती मते मिळतात आणि शिवसेनेला मिळणारी दलित समाजाची मते आपल्याकडे खेचण्यात मध्ये वंचित एमआयएमला किती यश मिळतं यावर या मतदारसंघाचा निकाल अवलंबून असेल. बड्या राजकीय उमेदवारांच्या मतविभाजनात नेमकं बाजी कोण मारत याकडे सर्वांचे लक्ष असणार हे मात्र नक्की.
Last Updated : Sep 28, 2019, 8:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.