ETV Bharat / state

गावाचा कारभारी कोण? औरंगाबाद जिल्ह्यात सरपंचपदाचे आरक्षण 29 जानेवारीला - सरपंच आरक्षण सोडत

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता सर्व सदस्यांचे लक्ष सरपंच पदाकडे लागले असून, त्यासाठी येत्या २९ जानेवारीला तहसील स्तरावर आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडणार आहे.

Reservation lottray of Sarpanch
Reservation lottray of Sarpanch
author img

By

Published : Jan 23, 2021, 2:24 AM IST

वैजापूर (औरंगाबाद) - जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता सर्व सदस्यांचे लक्ष सरपंच पदाकडे लागले असून, त्यासाठी येत्या २९ जानेवारीला तहसील स्तरावर आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणूकीची घोषणा होण्यापूर्वीच सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. या प्रक्रियेनंतर दोनच दिवसांत राज्य निवडणूक आयोगाने मार्च ते डिसेंबरदरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

निवडणूकीपूर्वी महिनाभराच्या आयोगाने सरपंच पदाच्या आरक्षण आरक्षण सोडतीचे आदेश रद्द करून निवडणूकीनंतर ३० दिवसांच्या आत नव्याने सोडत घेण्याबाबत आदेश दिला होता. प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी कारभारी कोण आता ठरले असून, आता निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे लक्ष सरपंच पदाकडे लागले आहे. महिनाभराच्या आत केव्हाही पदासाठी सरपंच-उपसरपंच पदासाठी आरक्षण सोडत होईल, असे शासन आदेशात नमूद होते. त्यानुसार जिल्ह्यात येत्या २९ जानेवारीला आरक्षण सोडत घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रत्येक तहसील स्तरावर सोडत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर तयारी देखील सुरू करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.