औरंगाबाद - पैठण तालुक्यात काल (गुरुवार) शासकीय रुग्णालयामध्ये काम करणारे परिचारक (ब्रदर) यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांनतर आता ब्रदरच्या संपर्कात आलेल्या तालुक्यातील संशयितांची तपासणी करण्यात आली होती. 49 संशय रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा नि: श्वास टाकला आहे.
पैठण येथील शासकीय रुग्णालयात ब्रदर (परिचारक) कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर तातडीने या ब्रदरच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल आज त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या घटनेनंतर परदेशीपुरा, साठेनगर, जैनपुरा या भागातील नागरिकांनी दक्षता घेत आपापल्या कॉलनी स्वतः सील केल्या आहेत.