औरंगाबाद - भारताची गानकोकिळा म्हणून ओळख असलेल्या लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले ( Lata Mangeshkar Passed Away ) आहे. त्या 92 वर्षाच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी ( Breach Candy Hospital Mumbai ) रुग्णालयात उपचार सुरु होते. लता मंगेशकर यांच्यासोबत अनेकांच्या आठवणी जडल्या आहेत. तशीच आठवण प्रसिद्ध छायाचित्रकार किशोर निकम यांच्या आहेत. काही वर्षांपूर्वी एक अल्बमच्या निमित्ताने फोटो काढताना आलेल्या आठवणींनी त्यांचे डोळे पाणावले.
पुणे येथे व्हिडिओ अल्बमच्या चित्रीकरणात झाली भेट -
प्रसिद्ध छायाचित्रकार किशोर निकम यांनी लता मंगेशकर यांना फोटो काढण्याचे भाग्य मला लाभले असं सांगितलं. 2004 साली पुणे येथे व्हिडिओ अल्बमचे चित्रीकरणाच्या निमित्ताने त्यांची भेट झाली. निर्माता दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांची फोन करून तुला लतादीदींचे फोटो काढायचे त्यासाठी पुण्याला ये असं सांगितलं. इतकी मोठी संधी मिळाल्याने मला आनंद झाला. दीदींना भेटण्याची व बघण्याची मोठी उत्सुकता होती. त्यामुळे रात्रीच पुण्यावरून निघालो तर सकाळी लतादीदी पुण्याहून मुंबईला पोहोचलेल्या होत्या. गाण्याच्या चित्रीकरणाच्या आधी मीही त्यांच्या सोबत ओळख करून घेतली. आश्चर्याचा धक्का म्हणजे त्या दिवशी दीदींनी सर्वांना नावाने बोलत होत्या. त्या रात्री सोबत जेवण्याचे भाग्य मला लाभलं, असं किशोर निकम यांनी सांगितलं.
दीदींचे काढले चारशेहून अधिक छायाचित्र -
2004 मध्ये "मैत्र जीवांचे" या अल्बमचे छायाचित्र काढण्याची संधी मला मिळाली, याचा अनुभव किशोर निकम यांनी सांगितला. गाणं गात असताना अनेक भावमुद्रा मला टिपता आल्या, जवळपास दीदींचे चारशेहून अधिक फोटो काढण्याची संधी मला मिळाली होती. आजही तो ठेवा मी जपून ठेवला आहे. दीदींचे फोटो काढून झाल्यानंतर त्यांनी मला नावाने हाक मारून कॅमेऱ्यातील छायाचित्र दाखवण्याचं सांगितलं. मी त्यांना हे सर्व छायाचित्र दाखवल्यावर, त्यांनी हातात कॅमेरा घेऊन कॅमेरा बाबत माहिती विचारली. त्यामुळे मला एक वेगळा आणि चांगला अनुभव आला, असं मत किशोर निकम यांनी व्यक्त केलं.
रात्रीचा प्रवास करण्यास दिनी केला होता मज्जाव -
अल्बमच्या चित्रीकरणाच काम झाल्यावर, रात्री सोबत जेवण करण्याची संधी मिळाली. त्यावेळी दिदींनी स्वतःच्या हाताने तयार केलेली शेंगदाण्याची चटणी खाऊ घातली होती. जेवण करत असताना कोणाच्या ताटात काय कमी आहे, याबाबत त्या आवर्जून लक्ष देत होत्या. रात्री निघायच्या वेळेस मात्र त्यांनी कोणालाही रात्री प्रवास करू दिला नाही. आराम करून सकाळी जा, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर सकाळी उठून त्यांनी सर्वांना ऑटोग्राफ देखील दिल्याचा अनूभव किशोर निकम यांनी सांगितला.
हेही वाचा - MH MPs in Parliament : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?