वैजापूर (औरंगाबाद) - शिवसेनेतील बंडानंतर शिवसेनेतील वाद उफाळून येत असल्याचे दिसत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील बंडखोर आमदार रमेश बोरणारे ( Rebel MLA Ramesh Bornare ) हे पंधरा दिवसांनी आपल्या वैजापुरू तालुक्यात पोहोचले. ते शिंदे गटात ( Shinde group in Vaijapur ) सामील झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या मततदार संघात आले. त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून रैलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एक खासगी लॉन्सवर बैठकीचे आयोजनदेखील करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड करणारे शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांनी बैठक मेळाव्यात आपल्या भाषणात एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे.
आमदार रमेश बोरणारे म्हणाले, की औरंगाबादचे तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai Vs Ramesh Bornare ) यांच्याकडे आपण प्रश्न घेऊन गेलो. तेव्हा त्यांनी आपल्याला हॉटेलबाहेर जा, असे म्हणून हाकलले, असा आरोप बोरणारेंनी केला आहे. त्यावेळी त्यांनी सुभाष देसाई यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. मी तुमच्यासारखा विधानपरिषदेचा आमदार नाही झालो, अशा शब्दांत बोरणारेंनी देसाईंवर रोष व्यक्त केला आहे.
खैरे यांच्या आरोपाचे खंडन..! - काही दिवसांपूर्वी औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर आमदार रमेश बोरणारे यांनी ५० लोक त्यांच्या वर केलेले 50 कोटींच्या आरोपावर प्रश्न विचारला असता, आम्ही 50 कोटी देणारे आहे हे खैरे साहेबाना सांगा.मी अजून फार बोलणार आहे. फक्त अजून थोडा वेळ आहे असं देखील बोरणारे म्हणाले.
रमेश बोरणारे काय म्हणाले? पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मी माझ्या तालुक्यातील प्रश्न घेऊन गेलो होतो. तालुक्यातील प्रमुख प्रश्न होता, बारा लाख रुपये खर्च येईल असे सांगितले. पण एखाद्या सामान्य माणसा सारखं मला बाहेर जा म्हणाले..तशी ही पद्धत मी कुणाला सांगायची ? मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख वेगवेगळे असते तर पक्षप्रमुखाकडे मी पालकमंत्र्यांची तक्रार केली असती. परंतु ऐकायलाच कोणी तयार नाही. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख एकच असल्याने मी कुणाकडे दाद मागायची? असा सवाल बोरणारेंनी विचारला.
हेही वाचा-Sidhu Moose Wala Murder: सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई
हेही वाचा-Youth died falling in mine: खदानीत पडून तरुणाचा मृत्यू, मुंबईतील दहिसर भागातील घटना