ETV Bharat / state

सध्या भाजप-सेनेत लुटारुंची भरती; राजू शेट्टींचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा - raju shetti aurngabad

सध्या भाजप आणि सेनेमध्ये लुटारुंची भरती सुरू असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.

राजू शेट्टींचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
author img

By

Published : Sep 18, 2019, 3:57 PM IST

औरंगाबाद - सध्या भाजप आणि सेनेमध्ये लुटरुंची भरती सुरू असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. या लुटारुंची यादी मी लवकरच जाहीर करणार आहे. या सर्व चोरांनी कशा पद्धतीने लूट केली आहे, याची माहिती मी लवकरच जाहीर करणार असल्याचे शेट्टी म्हणाले. ते औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

साताऱ्यामध्ये निघालेल्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यात्रेवर कडकनाथ कोंबडी फेकून निषेध व्यक्त केला. राजू शेट्टींनी या आंदोलनाचे समर्थन केले आहे. ही सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे. या कोंबड्यांना अन्न द्या, अशी मागणी शेतकाऱ्यांनी केली होती. मात्र, ती मागणी पूर्ण झाली नसल्याने कोंबड्या अंगावर फेकून काय वाईट केलं, असा प्रश्नही शेटटींनी यावेळी केला.

राजू शेट्टींचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

सध्या जी भरती सुरू आहे ती लुटारूंची आहे. या लुटारूंची यादी मी लवकरच जाहीर करणार आहे. या सर्व चोरांनी कशा पद्धतीने लूट केली आहे याची माहिती मी लवकरच जाहीर करेल. कारवाई करण्याची भीती दाखवून भाजपने या सर्वांना वाल्याचा वाल्मिकी करण्याचे धोरण आखून आपल्या पक्षात प्रवेश दिला असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला.

राजू शेट्टींच्या उपस्थितीमध्ये औरंगाबादेत शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबादच्या क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ जाहीर सभेत बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारवर कडाडून टीका केली. सांगलीमध्ये जनादेश यात्रेसमोर केलेले आंदोलन म्हणजे सर्वसामान्यांची प्रतिक्रिया असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या ४ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कडकनाथच्या माध्यमातून घोटाळा झाला आहे. यामध्ये सर्वसामान्यांचे 500 कोटी अडकलेले आहेत. मुख्यमंत्र्यांकडे पोलीस खाते असून देखील एफआयआर करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. दबाव टाकल्यावर एफआयआर झाल्यानंतर दोन-चार लोकांना अटक करून इतरांना पाठीशी घालण्याचे काम सरकारने केले आहे. इस्लामपूर येथे निष्पाप शेतकऱ्यांवर लाठीचार्ज देखील केला.

नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीवेळी लातूर येथे आले होते. त्यावेळेस त्यांनी सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. २ कोटी नोकऱ्या देऊ असे आश्वासन दिले होते. नोकरभरती तर झाली नाही, मात्र, भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात भरती सुरू असल्याचा टोला राजू शेट्टींनी लगावला. लोकांना लुटणाऱ्याची मेगा भरती सध्या भाजपमध्ये सुरू आहे. चोरांची आणि लुटारूंची ही भरती सुरू असून मी लवकरच एक यादी जाहीर करणार आहे. भाजप आणि सेनेमध्ये गेलेल्या या सर्वांची चौकशी थांबवण्याचे आश्‍वासन दिल्यामुळे ही भरती सुरू असून, वाल्याचा वाल्मिकी करण्याचे हे धोरण सध्या आखल्याचे ते म्हणाले. लोकांना लुटण्यासाठी की मेगा भरती केली जात असून, दडपशाही केली तर सुशिक्षीत बेरोजगार गप्प बसतील असं वाटत असेल, तर त्यांचा हा गैरसमज असल्याचे शेट्टी म्हणाले.

Intro:सातारा मध्ये निघालेल्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यात्रेवर कडकनाथ कोंबडी फेकून आपला निषेध व्यक्त केला या आंदोलनाला शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी समर्थन केले आहे. ही सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे असं म्हणत या कोंबड्यांना अन्न द्या अशी मागणी शेतकाऱ्यांनी केली होती मात्र ती मागणी पूर्ण झाली नसल्याने कोंबड्या अंगावर फेकून काय वाईट केलं. करायला हवं असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.Body:सध्या भाजपमध्ये भरती सुरू असलेली भरती चोरांची यांनी लुटारूंची सुरू असल्याची टीका शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी औरंगाबादेत केली. सध्या जी भरती सुरू आहे ती लुटारूंची आहे आणि या लुटारूंची यादी मी लवकरच जाहीर करणार आहे. या सर्व चोरांनी कशा पद्धतीने लूट केली आहे याची माहिती मी लवकरच जाहीर करेल. कारवाई करण्याची भीती दाखवून भाजपने या सर्वांना वाल्याचा वाल्मिकी करण्याचे धोरण आखून आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे, असा आरोप देखील राजू शेट्टी यांनी औरंगाबादच्या जाहीर सभेत केला.Conclusion:राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये औरंगाबादेत शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबादच्या क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयात पर्यंत मोर्चा काढण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ जाहीर सभेत बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारवर कडाडून टीका केली. आज सांगलीमध्ये जनादेश यात्रेसमोर केलेले आंदोलन म्हणजे सर्वसामान्यांची प्रतिक्रिया असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं. कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या चार जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कडकनाथच्या माध्यमातून घोटाळा झाला, असून सर्वसामान्यांचे 500 कोटी यामध्ये अडकलेले आहेत. मुख्यमंत्र्यांकडे पोलीस खात असून देखील या एफआयआर करण्यासाठी टाळाटाळ केली, दबाव टाकल्यावर एफआयआर झाल्यानंतर दोन - चार लोकांना अटक करून इतरांना पाठीशी घालण्याचे काम सरकारने केले. इस्लामपूर येथे निष्पाप शेतकऱ्यांवर लाठीचार्ज देखील केला. उपाशी कोंबड्यांना चारा द्यायला हवा होता मात्र तसं झालं नाही तर महाजनादेश यात्रेवर कोंबड्या पिकल्या तर काय वाईट केलं? असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस लातूर येथे आले होते. त्यावेळेस त्यांनी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिलं होतं. दोन कोटी नोकऱ्या देऊ असं आश्वासन दिलं. नोकरभरती तर झाली नाही, मात्र भाजपात मोठ्या प्रमाणात भरती सुरू असल्याचा टोला राजू शेट्टी यांनी औरंगाबादेत लगावला. लोकांना लुटणाऱ्याची मेगा भरती सध्या भाजपमध्ये सुरू आहे. चोरांची आणि लुटारूंची ही भरती सुरू असून मी लवकरच एक यादी जाहीर करणार आहे, भाजप आणि सेनेमध्ये गेलेल्या या सर्वांची चौकशी थांबवण्याचा आश्‍वासन दिल्यामुळे ही भरती सुरू असून वाल्याचा वाल्मिकी करण्याचे हे धोरण सध्या आखल गेलं आहे. लोकांना लुटण्यासाठी की मेगा भरती केली जात असून दडपशाही केली तर सुशिक्षित बेरोजगार गप्प बसतील असं वाटत असेल, तर त्यांचा हा गैरसमज असल्याचं राजू शेट्टी यांनी औरंगाबाद सांगितलं.
Byte - राजू शेट्टी
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.