ETV Bharat / state

औरंगाबादच्या उपमहापौरपदी शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांची वर्णी

author img

By

Published : Jan 1, 2020, 10:10 AM IST

महाविकास आघाडी ही राज्यासह आता महापालिकेतही झाल्याचे चित्र औरंगाबद महानगरपालिकेच्या उपमहापौर निवडणुकीवेळी दिसून आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांच्या जोरावर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांची उपमहापौरपदी निवड झाली.

उपमहापौर राजेंद्र जंजाळ
उपमहापौर राजेंद्र जंजाळ

औरंगाबाद - शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांची महानगर पालिकेच्या उपमहापौरपदी निवड करण्यात आली. राज्यात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला औरंगाबाद महानगरपालिकेत पाहायला मिळाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांवर 30 वर्षांत पहिल्यांदा शिवसेनेने भाजपला सोडून पालिकेत सत्ता मिळवली.

शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांना 51 मते, भाजप पुरस्कृत गोकुळ मलखे यांना 34 मते, एमआयएमचे जफर बिल्डर यांना 13 मते मिळाली तर दोन जण तटस्थ राहिले. काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे मत मिळाल्याने शिवसेनेला महापौर पदासह उपमहापौर पदावर देखील विजय मिळवणे सोपे झाले.

शहराच्या पाणी योजनेच्या मुद्द्यावरून भाजपचे नगरसेवक विजय औताडे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिला होता. राज्य सरकार शहराच्या विकास कामांमध्ये खोडा घालत असल्याचा आरोप भाजपने करत पाणी योजना सुरू होत नाही, तोपर्यंत महानगर पालिकेत शिवसेना विरोधी भूमिका घेतल्याचे भाजपने जाहीर केले. भाजपच्या निर्णयाने काँग्रेस पक्षाला सत्तेत स्थान मिळेल, अशी आशा होती. त्यानुसार स्थानिक नेत्यांनी तसा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठवला होता. आघाडीबाबत निर्णय वेळेवर झाला नसल्याने शिवसेनेकडून राजेंद्र जंजाळ आणि काँग्रेसतर्फे अफसर खान यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज सादर केले. मात्र, ऐनवेळी काँग्रेसच्या अफसर खान यांनी आपला अर्ज मागे घेतला.

राज्यात उदयास आलेला महाविकास आघाडीचा फॉर्म्युला महानगरपालिकेतही राबवला गेला. शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उपमहापौरपदी निवड करण्यात आली. भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार गोकुळ मलखे यांनी निवडणूक लढवली होती. तर एमआयएमतर्फे जफर खान यांनी निवडणूक लढवली. शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांना 51, भाजप पुरस्कृत गोकुळ मलखे यांना 35 तर एमआयएमच्या जफर खान याना 13 मते मिळाली. काँग्रेसचे दोन नगरसेवक निवडणुकीत तटस्थ राहिले. तर 15 नगरसेवक गैरहजर राहिले.

हेही वाचा - एमआयएमच्या ६ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी

औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीला अवघे तीन महिने राहिल्याने कमी काळात जास्त कामे करावी लागणार असल्याच मत उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केल. राज्यात आघाडी झाल्यावर नवे समीकरण उदयास आले आहे. तेच समीकरण महानगर पालिकेत पाहायला मिळणार आहे. ही आघाडी जनतेच्या विकासासाठी केली असून भाजप राज्यात विरोधात असल्याने ते खोटे आरोप लावत सुटले असल्याचे मत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - चोरीच्या घटनांनी वर्ष गाजले; बलात्कार, दुखापत, जबरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ

Intro:शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांची महानगर पालिका उपमहापौरपदी निवड करण्यात आली. राज्यात महाविकास आघाडीचा फार्म्युला औरंगाबाद महानगर पालिकेत पाहायला मिळाला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांवर तीस वर्षात पहिल्यांदा शिवसेनेने भाजपला सोडून पालिकेत सत्ता मिळवली.
Body:शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांना 51, भाजप पुरस्कृत गोकुळ मलखे यांना 34, एमआयएमचे जफर बिल्डर 13 मत मिळाली तर दोन जण तठस्त राहिले. काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे मत मिळाल्याने शिवसेनेला महापौर पदासह उपमहापौर पदावर देखील विजय मिळवणं सोपं झालं. Conclusion:शहराच्या पाणी योजनेच्या मुद्द्यावरून भाजपचे नगरसेवक विजय औताडे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिला. राज्य सरकार शहराच्या विकास कामांमध्ये खोटा घालत असल्याचा आरोप भाजपने करत पाणी योजना सुरू होत नाही तो पर्यंत महानगर पालिकेत शिवसेना विरोधी भूमिका घेतल्याच भाजपने जाहीर केलं. भाजपच्या निर्णयाने काँग्रेस पक्षाला सत्तेत स्थान मिळेल अशी आशा होती. त्यानुसार स्थानिक नेत्यांनी तसा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठवला होता. आघाडी बाबत निर्णय वेळेवर झाला नसल्याने शिवसेनेकडुन राजेंद्र जंजाळ आणि काँग्रेस तर्फे अफसर खान यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज सादर केले. मात्र ऐन वेळी काँग्रेसच्या अफसर खान यांनी आपला अर्ज मागे घेतला. राज्यात उदयास आलेला महाघाडीचा फार्म्युला महानगर पालिकेत राबवला गेला. शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उपमहापौर पदी निवड करण्यात आली. भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार गोकुळ मलखे यांनी निवडणूक लढवली होती तर एमआयएम तर्फे जफर खान यांनी निवडणूक लढवली. शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांना 51, भाजप पुरस्कृत गोकुळ मलखे यांना 35 तर एमआयएमच्या जफर खान याना 13 मत मिळाली. काँग्रेसचे दोन नगरसेवक निवडणुकीत तठस्त राहिले. तर 15 नगरसेवक गैरहजर राहिले. औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीला अवघे तीन महिने राहिल्याने कमी काळात जास्त काम करावी लागणार असल्याच मत उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केलं. राज्यात आघाडी झाल्यावर नवं समीकरण उदयास आल आहे. तेच समीकरण महानगर पालिकेत पाहायला मिळणार आहे. ही आघाडी जनतेच्या विकासासाठी केला असून भाजपला अहंकार असून राज्यात विरोधात असल्याने ते खोटे आरोप लावत सुटले असल्याच मत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलं.
Byte - राजेंद्र जंजाळ - उपमहापौर
Byte - चंद्रकांत खैरे - शिवसेना नेते
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.