ETV Bharat / state

धक्कादायक..! कोरोनाच्या दहशतीमुळे मनोरुग्णांच्या संख्येत वाढ, दिसतात अशी लक्षणे - मानसोपचार तज्ज्ञ

कोरोनाच्या भीतीमुळे मानसिक रुग्णांमध्ये वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे कोरोनाची भीती वाटक असल्यास तत्काळ डॉक्टरांशी चर्चा करण्याचा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप सिसोदिया यांनी दिला.

डॉ. संदीप सिसोदियाडॉ. संदीप सिसोदिया
डॉ. संदीप सिसोदिया
author img

By

Published : Apr 1, 2020, 7:36 PM IST

औरंगाबाद - कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जसजसे आकडे वाढत आहेत तसतसे अनेकांच्या मनावरील दडपण वाढत आहे. काहीही झाले नसताना अनेकांना आपण आजारी असल्याचा भास होत आहे. कोरोना झाला तर आपले काय होईल, या दडपणात काहींना झोप लागत नाही. यामुळे मानसिक रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे घाबरून न जाता खंबीर राहण्याचा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.

माहिती देताना मानसोपचार तज्ज्ञ

आज कुठेही जा चर्चा आहे ती फक्त आणि फक्त कोरोनाची. वृत्त वहिनी, वृत्तपत्र, सोशल मीडिया सर्वच ठिकाणी कोरोनाबाबत येणाऱ्या माहितीमुळे अनेकांना मानसिक आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे. मानसोपचार तज्ज्ञांकडे कोरोनाबाबत भीती वाटत असल्याच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती डॉ. संदीप सिसोदिया यांनी दिली. सतत एखाद्या गोष्टीचा विचार केला तर ती गोष्ट घडत नसली तरी घडत असल्याचा भास होतो. त्यामुळे सतत कोरोना बाबत विचार करत असल्याने अनेकांना कुठलाच त्रास नसला तरी आपण आजारी आहोत. आपल्याला काही तरी होईल. आपल्याला कोरोना झाला तर? आपल्यासोबत आपले कुटुंब देखील आजारी पडले तर? आपल्या सहवासात येणारा व्यक्ती आजारी पडला तर? असे अनेक प्रश्नांनी व्यक्ती घेरली जात आहे.

या परिस्थिती येणाऱ्या विचारांमुळे अनेकांची झोप उडाली आहे. सतत करत असलेल्या विचारांमुळे अनेक भास होत असल्याने मानसिक आजार वाढत आहेत. मात्र, कोणीही चिंता करु नये. स्वतःची काळजी घेतली पाहिजे जास्त भीती वाटत असल्यास डॉक्टरांशी चर्चा करावी, असे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप सिसोदिया यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - गावकऱ्यांनो सावधान..! ग्रामीण भागात आता ड्रोन कॅमेरा ठेवणार नजर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.