ETV Bharat / state

प्रेयसी मृत भासवण्यासाठी चक्क वेश्येचा केला खून; 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला कट - affair

अनैतिक प्रेमसंबंधातून विवाहित प्रेयसी सोबत पळून जाण्यासाठी एकाने वेश्येची हत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादच्या पिसादेवी येथे घटली आहे. याप्रकरणी आरोपीसह त्याच्या प्रेयसीला चाळीसगाव येथून अटक करण्यात आली आहे.

प्रेयसी मृत भासवण्यासाठी चक्क वेश्येचा केला खून
author img

By

Published : Jun 10, 2019, 5:50 PM IST

औरंगाबाद - गुन्हे जगतातल्या अनेक गोष्टी वाहिन्यांवर कथेच्या माध्यमातून दाखवल्या जातात. अशाच एका कथानकावरून कल्पना घेत एका युवकाने आपली प्रेयसी मृत भासवण्यासाठी चक्क एका वेश्येची हत्या करून तिचा चेहरा जाळल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला. चिकलठाणा पोलिसांनी आरोपीसह त्याच्या प्रेयसीला चाळीसगाव येथून अटक केली आहे.

औरंगाबादच्या पिसादेवी शिवार येथे काही दिवसांपूर्वी एका महिलेचे अर्थवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह सोनाली शिंदे या महिलेचा असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. मृत शरीरावर असलेले कपडे आणि दागिने पाहून भावाने मृतदेह सोनालीचा असल्याचे सांगितले. त्यावरून सोनालीचा पती सदाशिव शिंदेला पोलिसांनी अटक केली होती. सदाशिव सध्या चिकलठाणा पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपीने 'क्राईम पेट्रोल' हा टीव्ही कार्यक्रम पाहून प्रेरणा घेत चक्क एका वेश्येची हत्या केली आहे. आपल्या प्रेयसीला पळवून नेण्यासाठी त्याने हा खून केला.

पोलीस उपनिरीक्षक महेश आंधळे गुन्ह्याविषयी माहिती सांगताना

पिसादेवी शिवारात २५ मे रोजी अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तपास केला असता सोनाली शिंदे नावाची महिला गायब असल्याची तक्रार प्राप्त असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सोनाली शिंदेच्या भावाला बोलावले. भावाने मृतदेह बहिणीचाच असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर सोनालीच्या भावाच्या तक्रारीवरून सोनालीचा पती सदाशिव शिंदेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली.

सोनाली चक्क जिवंत...

या प्रकरणाचा अधिक तपास करत असताना सोनालीचे छबादास वैष्णव या व्यक्तिसोबत अनैतिक संबंध असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पोलिसांनी छबादासची माहिती काढली असता तो एका महिलेसोबत बाहेरगावी गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चाळीसगाव गाठून छबीदासला ताब्यात घेतले. मात्र, धक्कायक बाब म्हणजे सोनाली शिंदे जिवंत असून ती त्याच्यासोबत राहत असल्याचे समोर आले.

विवाहित प्रेयसी सोबत पळून जाण्यासाठी वेश्येची हत्या

छबीदास आणि सोनालीची चौकशी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले. छबीदास आणि सोनाली आधीपासून प्रेमात होते. मात्र, सोनालीच्या कुटुंबीयांनी सदाशिव सोबत लग्न लावून दिले. मात्र, त्यांचे भेटणं हे चालूच होते. छबीदास आणि सोनालीला एकत्र राहायचे होते. त्यातच त्यांनी क्राईम पेट्रोलचा एक भाग पाहिला आणि त्यांना मार्ग मिळाला. छबीदासने एक वेश्या शोधली आणि तिचा खून केला. इतकेच नाही तर ती सोनाली वाटावी म्हणून तिचा चेहरा जाळून टाकला. आणि मृतदेह पिसादेवी शिवारात फेकून सोनाली आणि छबीदास पसार झाले. विरांगणाची हत्या करताना छबीदासने सोनालीचे कपडे आणि दागिने त्यामृत शरीरावर परिधान केल्याने तो मृतदेह सोनालीचा असल्याचा भास सोनालीच्या भावाला झाल्याचे निष्पन्न झाले.

अनैतिक प्रेमसंबंधातून घडलेला हा धक्कादायक प्रकार होता. हत्या झालेली वेश्या कोण होती याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी योग्य दिशेने तपास केल्याने खऱ्या आरोपीला अटक झाली. अन्यथा सोनालीचा पती निर्दोष असताना त्याला शिक्षा झाली असती. अनेक वेळा समाजात जागरूकता निर्माण व्हावी म्हणून क्राईम पेट्रोल सारख्या मालिका दाखवल्या जातात. मात्र, त्याच बरोबर या मालिकांचा दुष्परिणाम देखील असल्याचे दिसून येत आहेत.

Intro:क्राईम जगतातल्या अनेक गोष्टी वाहिन्यांवर कथेच्या माध्यमातून दाखवल्या जातात. अश्याच एका कथानकावरून कल्पना घेत एका युवकाने आपली प्रियसी मृत भासवण्याचा चक्क एका वैश्येची हत्या करून तिचा चेहरा जाळल्याची धक्कादायक प्रकार औरंगाबादेत समोर आला. चिखलठाणा पोलिसांनी आरोपीसह त्याच्या प्रियसीला चाळीसगाव येथून अटक केली आहे.
Body:औरंगाबादच्या पिसादेवी शिवार येथे काही दिवसांपूर्वी एका महिलेचं अर्थवट झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. हा मृतदेह सोनाली शिंदे या महिलेचा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. मृत शरीरावर असलेले कपडे आणि दागिने पाहून भावाने मृतदेह सोनालीचा असल्याचं सांगितलं. तावरून सोनालीचा पती सदाशिव शिंदेला अटक केली होती. Conclusion:VO1 - चिखलठाणा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या आरोपीने क्रम पेट्रोल पाहून प्रेरणा घेत चक्क एका विरांगनेची हत्या केलीये. ती देखील आपल्या प्रियसीला पळवून नेण्यासाठी. पिसादेवी शिवारात २५ मी रोजी अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपस केला असताना सोनाली शिंदे नावाची महिला गायब असल्याची तक्रार प्राप्त असल्याने सोनाली शिंदेच्या भावाला बोलावण्यात आले. सोनालीच्या भावाने मृतदेह बहिणीचाच पोलिसांना सांगितलं सोनालीच्या भावाच्या तक्रारीवरून सोनालीच्या पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून चिखलठाणा पोलिसांनी सदाशिव शिंदेला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपस करत असताना सोनालीचे तिचे छबादास वैष्णव या माणसासोबत अनैतिक संबंध असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पोलिसांनी छबादासची माहिती काढली असता तो एका महिलेसोबत बाहेरगावी गेल्याची माहिती मिळाली. त्यामाहितीनुसार पोलिसांनी चाळीसगाव गाठून छबीदासला ताब्यात घेतलं असता सोनाली शिंदे जिवंत असून ती त्याच्यासोबत राहत असल्याचं समोर आलं.

BYTE - महेश आंधळे - पोलीस उपनिरीक्षक

VO2 - छबीदास आणि सोनालीची चौकशी केली असता धक्कादायक वास्तव समोर आलं. छबीदास आणि सोनाली आधीपासून प्रेमात होते, मात्र सोनालीचा कुटुंबीयांनी सदाशिव सोबत लग्न लावून दिल. मात्र त्यांचं भेटणं हे चालूच होत. छबीदास आणि सोनालीला एकत्र राहायचं होत त्यातच त्यांनी क्रिम पेट्रोलचे एक धारावाहिक पहिले आणि त्यांना मार्ग मिळाला. छबीदासने एक वीरांगना शोधली आणि तिचा खून केला. इतकंच नाही तर ती सोनाली वाटावी म्हणून तिचा चेहरा जाळून टाकला. आणि मृतदेह पिसादेवी शिवारात फेकून सोनाली आणि छबीदास पसार झाले. विरांगणाची हत्या करताना छबीदासने सोनालीचे कपडे आणि दागिने त्यामृत शरीरावर परिधान केल्याने तो मृतदेह सोनीलाच भास सोनालीच्या भावाला झाल्यास निष्पन्न झालं.

BYTE - महेश आंधळे - पोलीस उपनिरीक्षक

VO3 - अनैतिक प्रेमसंबंधातून घडलेला हा धक्कादायक प्रकार होता. हत्या झालेली वीरांगना कोण होती याबाबत पोलिसांनी तपस सुरू केला आहे. पोलिसांनी योग्य दिशेने तपस केल्याने खरे आरोपी अटक झाले अन्यथा सोनालीच्या पती निर्दोष असताना शिक्षेचा धनी व्हावा लागलं असतं हे तितकाच खार आहे. अनेक वेळा समाजात जागरूकता निंरं व्हावी म्हणून क्राईम पेट्रोल सारखे धारावाहिक दाखवले जातात. मात्र त्याच बरोबर या धारावाहिकचे दुष्परिणाम देखील असल्याचं दिसून आलं.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.