ETV Bharat / state

औरंगाबाद : अजिंठा लेणी परिसरात खासगी वाहनांना परवानगी, दरही निश्चित

author img

By

Published : Nov 14, 2021, 10:01 AM IST

अजिंठा लेणी पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक येत असतात. मात्र या पर्यटकांना एसटी बंदचा फटका बसला आहे. अजिंठा लेणी परिसरात जात असताना फरदापूरजवळ आपली खासगी वाहने सोडून लेणी पाहण्यासाठी जाताना बस उपलब्ध नसल्याने बैलगाडीच्या माध्यमातून प्रवास करावा लागत होता.

अजिंठा लेणी
अजिंठा लेणी

औरंगाबाद - एसटी संपाचा फटका पर्यटकांना बसत असल्याने अजिंठा लेणी परिसरात आता खासगी वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना काहीसा दिलासा मिळाला असून त्याबाबत ते दरदेखील निश्चित करून देण्यात आले आहेत.

बैलगाडीत पर्यटकांनी केला प्रवास

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक येत असतात. मात्र या पर्यटकांना एसटी बंदचा फटका बसला आहे. अजिंठा लेणी परिसरात जात असताना फरदापूरजवळ आपली खासगी वाहने सोडून लेणी पाहण्यासाठी जाताना बस उपलब्ध नसल्याने बैलगाडीच्या माध्यमातून प्रवास करावा लागत होता. त्यांची आर्थिक फसवणूकही होत होती, मात्र पर्यटकांची संख्या जास्त आणि बैलगाडी मर्यादित परिणामी अनेक पर्यटकांना पायी जावे लागायचे तर अनेक प्रवासी माघारी परतत होते. त्यामुळे पर्यटकांची सोय करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती.

खासगी वाहनांची व्यवस्था

एसटीच्या बसने लेणी परिसरात पाच किलोमीटरचे अंतर कापावे लागते. मात्र बस उपलब्ध नसल्याने पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. पर्यटकांच्या संख्येवर होणार परिणाम लक्षात घेता खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली. स्कूल बससह खासगी प्रवासी वाहतूक करणारी बस, कार यांना परवानगी देण्यात आली. त्यासाठी तीस रुपये शुल्क निश्चित करण्यात आले. त्यामुळे आता पर्यटकांची फसवणूक होणार नाही, असा विश्वास स्थानिक व्यवसायिकांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.