ETV Bharat / state

योगेश राठोड मृत्यू प्रकरण : पोलिसांनीच केली होती अमानुष मारहाण, दुसऱ्या कैद्याचा धक्कादायक खुलासा

१९ जानेवारीला योगेश राठोड या कैद्याचा मृत्यू झाला होता. १८ जानेवारीला न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या प्रकरणात कारागृहातील अनेक कैद्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. पण, अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आली नाही.

पॅरोलवर असणारा कैदी जयदीप
author img

By

Published : Mar 31, 2019, 1:10 PM IST

Updated : Mar 31, 2019, 2:23 PM IST

औरंगाबाद - योगेश राठोड या कैद्याचा काही दिवसांपूर्वी हर्सुल कारागृहात संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी कारागृह प्रशासनावर आरोप करत चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणात आता नवीन तथ्य समोर येत आहे. पॅरोल रजेवर असणारा कैदी जयदीप वगर याने पत्रकार परिषद घेत पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. यात त्याने योगेशला अमानुष मारहाण झाल्याचे म्हटले आहे.

पॅरोलवर असणाऱ्या कैद्याने पोलीस अधिकाऱ्यावर आरोप केले आहेत.

१९ जानेवारीला योगेश राठोड या कैद्याचा मृत्यू झाला होता. १८ जानेवारीला न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या प्रकरणात कारागृहातील अनेक कैद्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. पण, अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आली नाही. अशातच या कैद्याच्या आरोपांमुळे या प्रकरणात नव्याने वेगळे वळण आले आहे.

जयदीप वगर हा हर्सुल कारागृहातच शिक्षा भोगत आहे. तो सध्या पॅरोलवर आहे. त्याने सांगितले, की वरिष्ठ पोलीस अधिकारी आशीष गोसावी योगेश लाकडी दांड्याने मारहाण करत होते. त्यानंतर त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. मी जबाब नोंदविण्याचा खूप प्रयत्न केला. पण गोसावी यांनी दमदाटी करुन मला जबाब नोंदवू दिला नाही, असा आरोप त्याने केला आहे.

Intro: योगेश राठोड या तरुणाचा हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडी दरम्यान 19 जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणी खूनाचा गुन्ह दाखल करण्यात आला होता. तपास काही पुढे सरकार नव्हता. मात्र याच प्रकरणात संचित रजेवर आलेल्या एका खुनातील आरोपीने गौप्यस्फोट करीत माझ्या समोर पोलीस अधिकारीने लाकडी दांड्याने राठोड ला मारहाण केली होती व गुन्हा दाखल झाल्यानंतर मला साक्ष देण्यापासून रोखण्यात आले होते.दावा सुट्टीवर आलेल्या बंदीवाणाने केला.

Body:तीन वर्षे जुन्या प्रकरणात योगेश राठोडला 18 जानेवारी रोजी न्यायालयाने कोठडी सुनावली होती.मात्र 19 जानेवारी रोजी त्याचा कारागृहातून रुग्णालयात नेताना अचानकपणे मृत्यू झाला होता.नातेवाईकांनी केलेल्या आंदोलनानंतर हर्सूल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी हर्सूल कारागृहातील बंदीवाणाचे जबाब नोंदविले मात्र आज पर्यंत या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.या प्रकरणाचा तपास थडवल्याच जाणवत असतानाच आज बंदीवाणाने पत्रकार परिषद घेत या प्रकरणाचा खुलासा केला आहे. जयदीप रोहिदास वगर हा तरुण हत्येच्या आरोपाखाली सध्या हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत आहे. तो सध्या संचित रजेवर आलेला आहे.त्याने पत्रकार परिषदेत असा दावा केला आहे की, 19 जानेवरी रोजी वरिष्ठ तुरुंग अधिकारी आशिष गोसावी हे एका लाकडी दांड्याने योगेश राठोडला बेदम मारहाण करीत होते. त्यानंतर त्यास रुग्णालयात हलविले दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कारागृहातील बंदिवान याना पैशे देऊन पोलिसांकडे जाबाब नोंदवोण्यास भाग पाडण्यात आले.

Conclusion:मी घटनेचा साक्षीदार आहे.मी जबाब नोंदविण्यासाठी खूप प्रयत्न केले.मात्र ही बाब तुरुंग अधिकारी गोसावी यांना माहिती होताच त्यांनी मला शिवीगाळ करून दमदाटी केली असा आरोप जयदीप वगर यांनी केला..
-----------

हर्सूल कारागृहात बंदिवान मानवधिकारा पासून वंचित

एकाच ब्यारेग मध्ये शेकडो लोकांना कोंबले जाते.बंदीवाना ना जनावरसारखे वागविण्यात येते.पत्रही लिहिण्याची स्वतंत्रता नाही. निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते. व हर्सूल कारागृहातील कर्मचारी त्याचे कामही बंदीवाना कडून करून घेतात या प्रकरणा विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार

-राहुल वाढवे (पूर्व बंदिवान)
Last Updated : Mar 31, 2019, 2:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.