ETV Bharat / state

'संभाजीनगर'च्या मुद्यावरून राजकारण तापले - औरंगाबाद संभाजीनगर वाद

नामांतराच्या प्रश्नावरून आता राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला काँग्रेसचा नेहमीच विरोध असेल, अशी भूमिका जाहीर केली. त्यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सावरासावर करत, काही मतांसाठी त्यांनी ही भूमिका जाहीर केली असली तरीदेखील संभाजी महाराजांना त्यांचा विरोध नाही, असे स्पष्टीकरण खैरे यांनी दिले.

औरंगाबाद
औरंगाबाद
author img

By

Published : Jan 1, 2021, 4:55 PM IST

औरंगाबाद - शहराच्या नामांतराच्या प्रश्नावरून आता राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला काँग्रेसचा नेहमीच विरोध असेल, अशी भूमिका जाहीर केली. त्यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सावरासावर करत, काही मतांसाठी त्यांनी ही भूमिका जाहीर केली असली तरीदेखील संभाजी महाराजांना त्यांचा विरोध नाही, असे स्पष्टीकरण खैरे यांनी दिले.

औरंगाबाद

राष्ट्रवादी तयार, मतांसाठी काँग्रेसचा विरोध...

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी अनेकदा शहराचे नाव संभाजीनगर लवकरात-लवकर करावे, असे म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा विषय येत नाही. काँग्रेस काही मतांसाठी शहराचे नाव बदलासाठी विरोध करत आहे. मात्र, शहराचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात बहुमताने मंजूर झाला आहे. कायदेशीर प्रक्रियेत प्रस्ताव अडकला होता. मात्र, त्याचा मार्गही मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः शहराचे नाव बदलण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे लवकरच शहराचे नाव बदलले जाईल, अशी भूमिका चंद्रकांत खैरे यांनी जाहीर केली.

विभागीय आयुक्तांनी मार्च महिन्यातच पाठवला प्रस्ताव..

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्यामार्फत मार्च महिन्यात पाठवण्यात आला आहे. नऊ महिने झाले तरी या प्रस्तावावर अद्यापही सरकारमध्ये चर्चा नाही. त्यामुळे शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे? याबाबत प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र, शिवसेना शहराचे नाव बदलणार यात काही शंका नसल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. मार्च महिन्यानंतर कोरोनाच्या महामारीमुळे टाळेबंदी लावण्यात आली. मंत्रालयातदेखील कोणीही उपस्थित नव्हते. हे वर्ष अडचणीच गेले, मात्र परिस्थिती सुरळीत झाली कि निश्चित मुख्यमंत्री या मुद्याकडे लक्ष घालतील, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.

काँग्रेसच्या भूमिकेचे एमआयएमकडून स्वागत..

औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणाऱ्या एमआयएम पक्षाने काँग्रेसच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. शहराचे नाव बदलून कुठलाही विकास होणार नाही. शहराच्या अडचणी शिवसेनेने लक्षात घ्यायला हव्यात. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शहरात पाणी आणि रस्त्यांची मोठी समस्या आहे. निवडणुका आल्या की शहराच्या नामांतराचा मुद्दा घेऊन शिवसेना नेहमीच राजकारण करते. काँग्रेसने आपली भूमिका जाहीर करून शिवसेनेच्या मागणीला कुठेतरी विरोध केलेला आहे. आता सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने देखील आपली बुद्धिमत्ता वापरून आपली भूमिका जाहीर करावी, असे मत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले आहे.

शहराच्या नामांतर मुद्द्यात मनसेची उडी...

बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची भूमिका जाहीर केल्यानंतर त्या भूमिकेला मनसेने विरोध केला. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर असावे अशी भूमिका दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची होती. त्यामुळे आता त्यांची भूमिका महत्त्वाची का सत्तेची लाचारी हे शिवसेनेने ठरवले पाहिजे. यापुढे शिवसेनेने शहरात नाव संभाजीनगर उच्चारू नये, असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी मनसेने देखील केली आहे. मार्च महिन्यात पक्षप्रमुख राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले असताना मनसेने शहराच्या नामांतराच्या मुद्द्यात उडी घेतली. त्यानंतर मागील आठवड्यात मनसेने शहरात संभाजीनगर नाव करण्याबाबत सरकारला 26 जानेवारीचा अल्टिमेटम दिला. आज सत्तेची लाचारी स्वीकारत नामांतराला विरोध करणाऱ्या पक्षांसोबत उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे शिवसेनेची भूमिका संशयास्पद असल्याचे मत मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.