ETV Bharat / state

बिडकीन अत्याचार घटनेनंतर राजकीय वातावरण तापले, चित्रा वाघांनी दिली घटनास्थळी भेट

पैठण तालुक्यातील बिडकीन गावाजवळील तोंडुळी वस्तीवर दोन महिलांवर सामूहिक अत्याचाराची घटना समोर आली. त्यानंतर राजकारण देखील तापले आहे.

Bidkin
बिडकीन अत्याचार
author img

By

Published : Oct 21, 2021, 9:04 PM IST

Updated : Oct 21, 2021, 10:21 PM IST

औरंगाबाद - पैठण तालुक्यातील बिडकीन गावाजवळील तोंडुळी वस्तीवर दोन महिलांवर सामूहिक अत्याचाराची घटना समोर आली. त्यानंतर आता राजकारण देखील तापले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज घटनास्थळी भेट देऊन सरकारवर निशाणा साधला. तर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया देताना भाजप नेत्या चित्रा वाघ आणि शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे
  • चित्रा वाघ यांची सरकारवर टीका -

पैठण येथील घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे. राज्यात महिला व मुलींचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. अत्याचारग्रस्त कुटुंबीयांना तातडीची मदत केली पाहिजे. शिवशाहीचे वचन देणार्‍यांनी निजामशाही आणली आहे. राज्यात मोगलाई आली आहे. यांचे माजी गृहमंत्री फरार होतात, तर हे आरोपी कसे सापडतील?, अशी टीका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

  • नीलम गोऱ्हे लवकरच घेणार पीडित कुटुंबियांची भेट -

पैठण येथील पीडित कुटुंबियांना समुपदेशनाची गरज आहे. त्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मी जाणार असून, आरोपींना तातडीने अटक करण्याची गरज आहे, असे शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे म्हणाल्या. या घटनेसोबतच नगर जिल्ह्यात पारनेरमध्येही एका अल्पवयीन मुलीचा खून झाला आहे. या प्रकरणात तातडीने तपास करण्याचे निर्देश दिल्याची माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली.

हेही वाचा - औरंगाबादेत क्रूरतेचा कळस: बिडकीन तालुक्यात चार दरोडेखोरांचा दोन महिलांवर सामूहिक बलात्कार

Last Updated : Oct 21, 2021, 10:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.