औरंगाबाद - गतवर्षी घबराट पासरविणाऱ्या स्वाईन फ्लूचा धोका यावर्षीही कायम आहे. वातावरणातील बदलाने स्वाईन फ्लूसाठी पोषक विषाणूंत वाढ झाल्याने अडीच महिन्यात तब्बल ३२ जणांचा लागण झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात दोघांचा तर शुक्रवारी (१५ मार्च) रोजी शहरातील सातारा पोलीस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षक बापू अण्णा पोलसाने यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला.
सध्या शहरात ३२ स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. यापैकी २७ रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पाच जणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.स्वाईन फ्लूची लक्षणे आढळताच तातडीने उपचार घ्यावा, अन्यथा थोडासा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो.चालू वर्षात स्वाईन फ्लू संशयित तीन जणांचा जीव गेल्याने आरोग्यविभागाने देखील खबरदारी घेतली आहे.