ETV Bharat / state

Police Commissioner Of Sambhaji Nagar : अंबादास दानवे यांच्या तक्रारीनंतर झाली पोलीस आयुक्तांची बदली - औरंगाबाद पोलीस आयुक्तांची बदली

विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता अवैध धंद्यांना चालना देत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मनोज लोहिया यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Ambadas Danve
अंबादास दानवे
author img

By

Published : Apr 25, 2023, 3:43 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी पोलिसांवर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर पोलीस आयुक्तांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याला 60 ते 80 लाख रुपयांची काळा पैसा जमा केला जात असल्याचा आरोप करत पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. आता पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या जागी मनोज लोहिया यांना आयुक्त बनवण्यात आले आहे.

विरोधीपक्ष नेत्यांनी केला होता आरोप : विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता अवैध धंद्यांना चालना देत असल्याचा आरोप केला होता. शहरात अवैध पद्धतीने गुटखा विक्री, मटका, दारू, वाळू वाहतूक सर्रास सुरू आहे. पैश्यांची घेवाण देवाण घेऊन अवैध धंदे सुरू आहेत. वसुलीसाठी काही अधिकारी नेमले आहेत तर खाजगी लोकांच्या माध्यमातून देखीलही वसुली केली जात आहे. इतकेच नाही तर कोणत्या अवैध धंद्यातून किती पैसे जमा केले जातात, याबाबतची आकडेवारी सह माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जाहीर केली आहे. याबाबत गृह विभागाने लवकरात लवकर गांभीर्याने विचार करावा, असेही दानवे यांनी सांगितलं होते.

दंगलीबाबत केले होते आरोप : रामनवमीच्या रात्री कीराडपुरा भागात झालेल्या दंगलीत मोठं नुकसान झालं होतं. जमावाने तुफान दगडफेक करत पोलिसांची वाहन जाळली होती. या बाबत पोलिसांनी लवकर कारवाई न केल्याने ही परिस्थिती ओढवली होती. शहराचे नामांतर झाल्यानंतर शहरात काहीतरी गडबड किंवा दंगलही होऊ शकते, अशी भीती वर्तवण्यात आली होती. त्याबाबत पोलिस आयुक्तांना अनेक वेळा सूचना देऊनही त्यांनी प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही. इतकेच नाही तर रात्री जाळपोळ सुरू झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी लवकर पावलेही उचलली नाही. त्यामुळे परिस्थिती आणखीन बिघडली, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. पोलीस आयुक्तांवर जर कारवाई झाली नाही तर आपण आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी दिला होता. त्यानंतर सोमवारी पोलीस आयुक्तांची बदली झाली. नवीन पोलीस आयुक्तांची नेमणूक गृहविभागाने केली आहे. राज्यभरात बदल्या झाल्या असल्या तरी संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीची चर्चा सर्वत्र होत आहे.

हेही वाचा : Eknath Shindes leave News : मुख्यमंत्री पदाचा कारभार पुन्हा फडणवीस यांच्याकडे... जाणून घ्या कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.