औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या औरंगाबाद दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या इशारा देणाऱ्या शेतकरी नेत्यांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजरकैद केले आहे. काही आंदोलकांना पोलीस आयुक्तालयात तर काहींना अधीक्षक कार्यालयात पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे.
हेही वाचा - 'सिल्लोडची जागा सेनेला सोडू नका, अन्यथा बंडखोरी करणार'
मागील काही वर्षात शेतकाऱ्यांची अवस्था बिकट असून केंद्र सरकारने दिलेल्या योजनांचा उपयोग शेतकऱ्यांना होत नसल्याचा आरोप करत शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी करत मोदींच्या दौऱ्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे यांच्या घरावर पोलिसांनी रात्रीच बंदोबस्त लावून त्यांना नजरकैद केले होते. मात्र, सकाळी जयाजी सूर्यवंशी यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस आयुक्तालयात नजरकैद केले आहे.
हेही वाचा - निमित्त उद्घाटनाचे, अजेंडा विधानसभेचा; नरेंद्र मोदी ७ सप्टेंबरला राज्य दौऱ्यावर
बिडकीन औद्योगिक वसाहतीत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांच्या मोबदल्यासाठी संघर्ष केल्यावर दोन वर्षांनी बिगरव्याजी मोबदला मिळाला. पण, विहीर, फळबाग, मोठी फळ झाडे, स्थावर मालमत्ता, पाईपलाईन याच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांना न्यायालयात जावे लागले. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना विनाअट मोबदला मिळावा, तिसऱ्या टप्प्यातील जमिनीचे संपादन करून तातडीने मोबदला द्यावा आणि राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी जयाजी सूर्यवंशी यांनी अन्नदाता शेतकरी संघटना आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यापूर्वीच जयाजी सूर्यवंशी आणि इतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नजर कैदेत ठेवले आहे.
हेही वाचा - शिल्लेगावात घरगुती भांडणातून विवाहितेने विहिरीत घेतला गळफास