ETV Bharat / state

राजस्थानातील टोळी घातक शस्त्रासह गुन्हे शाखेच्या ताब्यात

राजस्थानातील गुन्हेगारांच्या टोळीच्या मुसक्या गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 23, 2021, 10:01 PM IST

औरंगाबाद - राजस्थानातील गुन्हेगारांची टोळीच्या मुसक्या गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या आहेत. त्यांच्याकडून शस्त्रासह 7 लाख 47 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार क्रांती चौकातून उस्मानपुराकडे जाणाऱ्या रस्त्यावर चारचाकी (आर जे 16 सी ए 6227) पोलिसांनी अडवले. त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता एक धारदार लोखंडी, तलवार, स्क्रू ड्रायव्हर, असे साहित्य मिळून आले. या प्रकरणी अमित भगवाणराम गेहलोत, मूकेशकुमार मंगणाराम, भावेशकुमार सुरेशकुमार, ऋतिककुमार भवरलालजी टाक (सर्व रा. राजेंद्रनगर, जालोर, राजस्थान) यांना अटक करण्यात आली.

मुंबईच्या दरोड्यातील गुन्हेगार

मूळचा राजस्थानातील अमित गेहलोत याच्यावर मुंबई येथील बंदूक लावून दरोडा टाकण्याच्या गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा - सिल्लोड : नागरिक म्हणतात खड्डे असलेले रस्तेच बरे होते

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.