ETV Bharat / state

वाईन शाॅपच्या मॅनेजरचा खून करणाऱ्या 'त्या' टोळीचा पर्दाफाश - robbery on wine shop in aurangabad news

आरोपींकडून 24 हजार रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, मोबाईल हँडसेट असा एकूण 1 लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

police-arrested-accused-in-robbery-on-wine-shop-in-aurangabad
वाईन शाॅपच्या मॅनेजरचा खून करून चार लाख रुपये पळविणाऱ्या 'त्या' टोळीचा पर्दाफाश
author img

By

Published : Dec 18, 2019, 8:45 PM IST

Updated : Dec 19, 2019, 11:37 AM IST

औरंगाबाद - येथील सिल्लोड शहरातील प्रियदर्शनी चौकात वाईन शॉपवर हल्ला करण्यात आला होता. यात मॅनेजर भिकन निळूबा जाधव व त्याचा सहकारी लक्ष्मण पुंजाजी मोरे या दोघांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आला होता. तसेच त्यांच्याकडील 4 लाखांची रोख रक्कम घेऊन अज्ञात आरोपींनी पळ काढला होता. यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

वाईन शाॅपच्या मॅनेजरचा खून करणाऱ्या 'त्या' टोळीचा पर्दाफाश

हेही वाचा- आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मद्यपींनी दिला त्रास; सभागृहात केली तक्रार

या घटनेत वाईन शॉपचा मॅनेजर भिकन जाधव यांचा मृत्यू झाला होता. तर लक्ष्मण मोरे गंभीर जखमी झाले होते. 12 मे 2019 रोजी रात्री दहा वाजता सिल्लोड शहरातील जय भवानी नगर भागात ही घटना घडली होती. या घटनेतील आरोपींचा औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शोध घेतला आहे.

हेही वाचा- डळमळीत अर्थव्यवस्थेचे आव्हान पेलण्यास महाविकास आघाडीचे सरकार सक्षम!

जवळपास सात महिन्यांनंतर या घटनेतील आरोपी शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. चेतन अशोक गायकवाड (वय 26 रा. शिक्षक कॉलनी, सिल्लोड) व त्याचा साथीदार अजय गुलाबराव रगडे (वय 30 रा. सातारा परिसर औरंगाबाद) तसेच संदीप आसाराम गायकवाड (वय 26 रा. परतूर जिल्हा जालना) असे आरोपींचे नावे आहेत. या तिघांनी मिळून सिल्लोड येथील वाईन शॉपचा मॅनेजर भिकन निळोबा जाधव यांच्यावर पाळत ठेवून हल्ला केला होता. तसेच त्यांच्याकडील रोख रक्कम घेऊन पळ काढला होता.

आरोपींकडून 24 हजार रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, मोबाईल हँडसेट असा एकूण 1 लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुलत व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

Intro:सिल्लोड शहरातील वाईन शॉप च्या मॅनेजरचा खून करून 4 लाख रुपये पळविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

औरंगाबादच्या सिल्लोड शहरातील प्रियदर्शनी चौकातील वाईन शॉपचा मॅनेजर भिकन निळूबा जाधव व त्याचा सहकारी लक्ष्मण पुंजाजी मोरे या दोघांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांच्याकडील 4 लाख रोख रक्कम घेऊन अज्ञात आरोपींनी पळ काढला होता या घटनेत वाईन शॉप चा मॅनेजर भिकन जाधव यांचा मृत्यू झाला होता तर लक्ष्मण मोरे गंभीर जखमी झाले होते. 12 मे 2019 रोजी रात्री दहा वाजता सिल्लोड शहरातील जय भवानी नगर भागात ही घटना घडली होती . या घटनेतील आरोपींचा शोध घेऊन औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या घटनेत खून करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
जवळपास सात महिन्यांनंतर या घटनेतील आरोपी शोधण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहेत.Body:घटनेनंतर पोलिसांच्या तपास यंत्रणेत सिल्लोड येथील गुन्हा चेतन अशोक गायकवाड वय 26 रा. शिक्षक कॉलनी, सिल्लोड व त्याचा साथीदार अजय गुलाबराव रगडे वय 30 रा. सातारा परिसर औरंगाबाद तसेच संदीप आसाराम गायकवाड वय 26 रा. परतुर जिल्हा जालना या तिघांनी मिळून सिल्लोड येथील वाईन शॉप चा मॅनेजर भिकन निळोबा जाधव यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्याकडील रोख रक्कम घेऊन खून केल्याचे तपासात दिसून आले.

मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी संशयित आरोपी वर पाळत ठेवत त्यांची सखोल चौकशी केली. या तपासात अजय रगडे व संदीप गायकवाड यांच्यावर जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील वाईन शॉपी च्या जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. या तिघांची चौकशी अंती त्यांच्याविरुद्ध भक्कम पुरावे पोलिसांना मिळून आल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसी खाकी दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
त्याचप्रमाणे आरोपींची अधिक विचारपूस करता अजय बोराडे व संदीप गायकवाड या दोघांनी यापूर्वी बदनापूर येथील वाईन शॉपी च्या जबरी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यातील गेल्या माला पैकी 24 हजार रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल , मोबाईल हँडसेट असा एकुन 1 लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुलत व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.Conclusion:अशी घडली होती घटना

12 डिसेंम्बर 2019 रोजी नेहमी प्रमाणे वाईन शॉप चे मॅनेजर भिकन निळूबा जाधव व त्यांचे दुकानातील सहकारी लक्ष्मण पुंजाजी मोरे हे रात्री 10 वाजता दुकान बंद करून मोटर सायकलने घराकडे निघाले होते. जयभावणी नगर भागातील अर्जुन ढाब्यामागे आरोपींनी मोटर सायकल आडवी लावून त्यांच्याकडील पैशाची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला. भिकन जाधव व लक्ष्मण मोरे यांनी आरोपींना विरोध केल्याने आरोपींनी धारदार शस्त्राने दोघांवर वार करीत त्यांच्याकडील 4 लाख रुपये घेऊन आरोपींनी पोबारा केला. यात भिकन जाधव यांचा मृत्यू झाला तर लक्ष्मण मोरे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 94/ 2019 कलम 302, 394, 397, 34 भादविन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी असा लावला तपास

सदर गुन्ह्याची माहिती मिळताच औरंगाबाद ग्रामीण गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असता त्यांना घटणास्थळावरून Pope last stitch असे इंग्रजीत नाव असलेले काळ्या रंगाचे बटन व खादिमा कंपनीच्या चपलेचा जोड आढळून आला. त्यावरून पोलिसांच्या पथकाने चेन्नई येथील संबंधित कंपनीशी संपर्क साधून माहिती घेतली असता सदर कंपनी ही फक्त ऑनलाइन विक्री करते असे समजले. त्याआधारे या कंपनीतून खरेदी करणारे जवळपास 10 हजार ग्राहकांची पोलिसांनी चाचपनी केली. यातून आरोपी अजय रगडे याने फ्लिपकार्ड द्वारे शर्ट व दोन चाकू मागविल्याचे निष्पन्न झाले. यातून पोलिसांनी घटनेचा तपास लावला.
Last Updated : Dec 19, 2019, 11:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.