ETV Bharat / state

अजिंठा लेणीवर कविता; लेणी जगविख्यात, शायर मात्र गुमनाम

author img

By

Published : Jun 23, 2021, 7:44 PM IST

Updated : Jun 23, 2021, 9:57 PM IST

अजिंठा लेणीचा करिष्मा जगाला अचंबित करणारा आहे. लेणी आणि परिसराचं सौंदर्य डोळे दिपून टाकणारं आहे. जुन्या काळी अजिंठा लेणीला स्वर्गाची उपाधी देण्यात आली होती.

Ajanta Caves
अजिंठा लेणी

औरंगाबाद - जगाला मोहिनी घालणाऱ्या अजिंठा लेणीचे अनेक पैलू आहेत. हे सौदंर्य कवितेत मांडण्यासाठी सातवे निजाम उस्मान अली खान यांनी एका शायरला खास कविता करण्यासाठी नियुक्त केले होते. कविता इतकी सुंदर होती की देशाचे दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू देखील या कवितेने प्रभावित होते. मराठवाड्यात स्वातंत्रपूर्व काळात निजामांची सत्ता होती. याच निजामाने सेशन कोर्टाच्या न्यायाधीश असलेल्या शायर सिकंदर अली वज्द यांना एकवर्षाची पगारी सुट्टी देऊन अजिंठा लेणीचं सौंदर्य कवितेत मांडायला सांगितलं.

'ई टीव्ही भारत'ने घेतलेला आढावा
  • शायर सिकंदर अली वज्द यांनी सादर केली मनमोहक कविता -

अजिंठा लेणीचा करिष्मा जगाला अचंबित करणारा आहे. लेणी आणि परिसराचं सौंदर्य डोळे दिपून टाकणारं आहे. जुन्या काळी अजिंठा लेणीला स्वर्गाची उपाधी देण्यात आली होती. या स्वर्गाचं वर्णन शब्दात मांडणं तितकं सोपं नव्हतं. मात्र अजिंठा लेणी आणि परिसराची माहिती सुंदर कवितेच्या रुपात जगासमोर आणावी यासाठी हैदराबादचे सातवे निजाम उस्मान अली खान यांनी प्रयत्न केला. त्यांनी त्याकाळचे सेशन कोर्टाचे न्यायाधीश आणि शायर सिकंदर अली वज्द यांच्यावर अजिंठा लेणीच्या सौंदर्यावर कविता करण्याची जबाबदारी दिली. नुसती जबाबदारी दिली नाही तर त्यांना एकवर्षाची पगारी सुट्टी देखील दिली. शायर सिकंदर अली वज्द हे मूळ औरंगाबादचे होते. त्यामुळे ते अजिंठा लेणीचे वर्णन सुंदररित्या करू शकतील असा विश्वास निजाम उस्मान अली खान यांना होता. सिकंदर अली वज्द यांनी त्यांचा विश्वास खरा करून दाखवला. शायर सिकंदर अली वज्द यांनी अजिंठा परिसरात जाऊन नुसती लेणी नाही पाहिली तर बाहेरून तिचा परिसर पाहिला. वाघूर नदीच्या तीरावर असलेला लेणी परिसर, वरून पडणारा धबधबा, तिथे असणारा निसर्गरम्य हिरवागार परिसर पाहून सिकंदर अली वज्द प्रभावित झाले आणि तिथेच त्यांनी आपल्या कवितेतला पहिला शेर लिहिला ज्यामध्ये त्यांनी अजिंठा लेणीच्या परिसराला "दक्खन कि गोद जहाँ जिग्मे जन्म लेती है..." असं संबोधलं.

  • कवितेत कारागिरांचा विशेष उल्लेख -

कवितेची रचना करत असताना सिकंदर अली वज्द यांनी लेणीचं सौंदर्य तर मांडलंच, मात्र त्याबरोबर त्या लेणीची निर्मिती करणाऱ्या कारागिरांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं. त्यामध्ये त्यांनी सर्वनष्ट होईल मात्र कलाकारांची कला जिवंत राहील असा उल्लेख केला. त्या ठिकाणी असलेले चित्र डोळ्यांनी पाहताना नुसते चित्र वाटतात. मात्र, या चित्रांना जर नीट लक्ष देऊन पाहिलं तर हे सर्व चित्र आपल्यासोबत बोलतात. अशी रचना या कवितेत त्यांनी केली. विशेषतः लेणीच्या परिसरात आलेल्या नर्तकीच्या चित्रांचं जिला महाजनक जातक म्हणलं जायचं ते चित्र पाहताना तुम्हा स्वर्गाचा आनंद मिळतो असं विशेष, असं वर्णन त्यांनी आपल्या कवितेत केलं, अशी माहिती इतिहास तज्ज्ञ रफत कुरेशी यांनी दिली.

  • पंडित जवाहरलाल नेहरू कवितेपासून होते प्रभावित-

कविता झाल्यावर ती ज्यावेळी सादर करण्यात आली त्यावेळी अजिंठा लेणीचं सौंदर्य सिकंदर अली वज्द यांच्या शब्दातून डोळ्यासमोर उभं राहीलं. कवितांची शब्द रचना इतकी मनमोहक होती की ज्यांनी ती कविता ऐकली तो अजिंठाच्या त्या निसर्गात वाहून गेल्यासारखा अनुभव व्हायचा. देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्या कवितेचा इतका प्रभाव होता की, त्यांच्याकडे नेहमी ती कविता असायची, मात्र सिकंदर अली वज्द यांच्या आवाजात आणि शैलीत कविता ऐकण्यासाठी ते अनेकवेळा सिकंदर अली वज्द यांना निमंत्रण देत असे. सेशन कोर्टाचे न्यायाधीश असलेले शायर सिकंदर अली वज्द यांना सरकारी नौकरी करण्यात रस नव्हता. त्यामुळे पदोन्नतीच्या संधी त्यांनी घेतल्या नाही. त्यांचं मन शायरी करण्यात रमत असे. अशा या महान शायरने अजरामर अशी कविता केली. आज सिकंदर अली वज्द यांची कविता दुर्लक्षित आहे. पर्यटकांना ती कविता आणि तिचं महत्व सांगण्याची गरज निर्मण झाली आहे, असं मत इतिहास तज्ज्ञ रफत कुरेशी यांनी व्यक्त केलं. जगाच्या पाठीवर अजिंठा लेणी प्रसिद्ध झाली मात्र कविता दुर्लक्षित राहिली असंच म्हणावं लागेल.

Last Updated : Jun 23, 2021, 9:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.