छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिसानिमित्त राज्य सरकार अकरा सूत्री कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत दिलीय. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ते छत्रपती संभाजीनगर शहरात आले होते. यावेळी मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते. योजनेसाठी यासाठी लागेल तितका निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील उपस्थित होते.
का राबवणार उपक्रम : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगात गौरव वाढवल्याटी अनुभूती G20 निमित्त आपल्याला आली. आपल्या सरकारनं घेतलेले निर्णय बाहेरच्या देशांपर्यंत गेले. पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिका G20 परिषदेत सहभागी झाली. हे जे चित्र पाहिलं त्यात भारताचा दबदबा पाहायला मिळाला. मोदींनी मांडलेल्या ठरावांना सर्व देशाच्या प्रमुखांनी एकमत दिले. त्यामुळं आपल्या व्यापाराला चालना मिळालीय. पेट्रोलला पर्याय मिळाला. यामुळं अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी मदत होणार आहे. महाराष्ट्राला याचा अभिमान आहे. महाराष्ट्र असं पहिलं राज्य आहे, ज्याचा यात मोठा वाटा ठरवणार आहे. आम्हाला निधी देण्याचं काम मोदी करत असल्याने राज्याचा विकास होतोय. राज्यात मोठे रस्ते तयार केले जात आहेत. राज्यातील कुठल्याही भागात आठ तासात पोहोचता आलं पाहिजे. मोठ्या प्रमाणात उद्योगही महाराष्ट्राला पसंती देत आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र नोदींची प्रशंसा केलीय. अकरा सूत्री कार्यक्रमातील कामाचा दर महिन्याला आढावा घेण्यात येईल. यामुळं वर्षभरात ही सर्व कामं पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय.
कसा असेल अकरा सुत्री कार्यक्रम :
1) महिला सशक्तीकरण मोहीम राबविण्यात येणार असून याअंतर्गत 73 लाख महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ देणार आहे. पाच लाख महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार, महिला सक्षम करण्याचे नियोजम करणार आहे.
2) नमो कामगार योजना, याअंतर्गत कामगारांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना. कुटुंबियांना सुविधा देणार, असंघटित कामगारांना मदत
3) शेत तळी उभारणार, त्यात मत्स्य व्यवसायासाठी उपाय योजना, मागेल त्याला शेततळे आणि सुलभतेने सुविधा
4) नमो आत्मनिर्भर योजना, यात पक्की घरे, पक्की रस्ते, रोजगार उपलब्ध
5) पाण्याच्या बाबतीत गाव सक्षम करणार. अशा योजना राबविण्याबाबत कामाला गती
6) 73 प्रगत शेतकऱ्यांचा सन्मान करणार, त्यातही कमी साधन आणि मेहनत घेऊन उत्पन्न डबल करणाऱ्यांचा सत्कार
7) नमो गरीब महागसावर्गीय विकास, याअंतर्गत गरिबांना पक्की घरं, गॅस कनेक्शन
8) 73 गावांचा विकास, शहराचे सौंदर्यीकरण नुसत्या इमारती नाही तर जीवनमान सुधरण्यासाठी चांगले चौक सुशोभीकरण व ते टिकून ठेवण्याची योजना.
9) नमो शाळा विकास अभियान, खेळात शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी काम
10) दिव्यांग मंत्रालय करणारे पाहिले राज्य आहे. दिव्यांगांची अचूक माहिती जमा करुन त्यांना योग्य सुविधा आनि साधनसामुग्री.
11) 73 क्रीडा संकुल, क्रीडांगण तयार करणार, उद्यान अत्याधुनिक अद्यावत
नमो तीर्थस्थळ योजनेअंतर्गत धार्मिक स्थळ, पुरातन आणि ऐतिहासिक मंदिरांचं जीर्णोद्धार, डिजिटल दर्शन सुरू करण्यात येणार आहे. आसपासचा परिसर स्वच्छ आणि चांगला करणार आहोत. जुने गड किल्ल्यांचे संरक्षण संवर्धन करणार आहोत. अशी अनेक विकासकामं या योजनेतून पूर्ण करण्यात येणार आहोत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हेही वाचा :