ETV Bharat / state

औरंगाबादेत भरले अनोखे फोटो प्रदर्शन - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान

औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानात हौशी छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

फोटो प्रदर्शन
author img

By

Published : May 12, 2019, 1:23 PM IST

औरंगाबाद - सिद्धार्थ प्राणी संग्रहालय उद्यानात शहरातील ६० युवा छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या विभागीय केंद्र औरंगाबाद आणि कलर्स ऑफ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे.

फोटो प्रदर्शन

छायाचित्र काढण्याची अनेकांना हौस असते. मात्र, काढलेले छायाचित्र जगासमोर आणण्याची संधी अनेकांना मिळत नाही. मात्र, अशाच हौशी छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांना वाव मिळावा. यासाठी औरंगाबादच्या काही छायाचित्रकारांनी अनोखी संकल्पना राबवली. इंस्टाग्राम या सोशल साईडवर हौशी छायाचित्रकारांसाठी अनोखा उपक्रम राबवत, हौशी छायाचित्रकारांची नोंदणी केली. यात शंभरहून अधिक हौशी छायाचित्रकारांनी नोंदणी केली. ऐतिहासिक, सांस्कृतिक औरंगाबाद तसेच निसर्ग, शहराची खाद्य संस्कृती, औरंगाबादेतील लेणी, किल्ले अशा विविध विषयांवरील छायाचित्रे मागवण्यात आली होती.

या मोहिमेत अनेक छायाचित्रकारांनी डोळे दिपून टाकणारी, मनाला स्पर्श करणारी अनेक छायाचित्रे काढली. यापैकी १०० छायाचित्रांची निवड प्रदर्शनासाठी करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. काढलेले छायाचित्र लोकांपर्यंत पोहचावे तसेच हौशी छायाचित्रकारांच्या कलेला वाव मिळावा, यासाठी गर्दीच्या ठिकाणी हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. हौशी छायाचित्रकारांच्या या प्रदर्शनाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे आयोजकांनी हे प्रदर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. सिद्धार्थ उद्यानात सर्व वयोगटातील लोक येतात. त्यांनी या प्रदर्शनाचा आनंद घेतला. त्यासोबतच शहरातील इतर गर्दीच्या ठिकाणी हे प्रदर्शन घेऊन जाण्याची आयोजकांची इच्छा आहे. क्रांतीचौक आणि काही मॉलमध्येही हे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे.

Intro:औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात अनोखं चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. हे प्रदर्शन आहे हौशी छायाचित्रकारांनी काढलेल्या फोटोचं.

Body:यशवंत चव्हाण प्रतिष्ठान, मुबंई - विभागीय केंद्र औरंगाबाद आणि कलर्स ऑफ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील 60 युवा छायाचित्रकारांच्या छायाचित्रांच प्रदर्शन लावण्यात आले होते.

Conclusion:छायाचित्र काढण्याची अनेकांना हौस असते मात्र काढलेले छायाचित्र जगासमोर आणण्याची संधी त्यांना मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळत नाही. अश्याच हौशी छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांना वाव मिळावा यासाठी औरंगाबादच्या काही छायाचित्रकारांनी अनोखी संकल्पना राबवली. इंस्टाग्राम या सोशल साईडवर हौशी छायाचित्रकारासाठी अनोखा उपक्रम राबवत. हौशी छायाचित्रकारांची नोंदणी केली. यात शंभरहून अधिक हौशी छायाचित्रकारांनी आपली नोंदणी केली. गेली दोन महिने या छायाचित्रकारांना औरंगाबादच्या ऐतिहासिक वारसा, निसर्ग, शहर अश्या विषयांवर छायाचित्र काढण्याचे आवाहन केले. या मोहिमेत अनेक छायाचित्रकारांनी डोळे दिपून टाकणारी, मनाला स्पर्श करणारी अनेक छायाचित्र काढली. या छायाचित्रांपैकी शंभर छायाचित्र निवडून त्यांचे प्रदर्शन भरवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. काढलेले छायाचित्र लोकांपर्यंत पोहचावे - हौशी छायाचित्रकारांच्या कलेला वाव मिळावा यासाठी गर्दीच्या ठिकाणी हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे.

byte - ज्ञानेश्वर गंभीर पाटील - आयोजक
byte - श्रीकृष्ण - हौशी छायाचित्रकार
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.