ETV Bharat / state

उरुसनिमित्त आले अन् लॉकडाऊनमुळे अडकले, फिरत्या चित्रपटगृह व्यवसायिकावर उपासमारीची वेळ - aurangabad

यात्रेनिमित्त व्यवसायासाठी कन्नड येथे आलेले औरंगाबादेतील आणि काही उत्तर भारतीय मजूर टाळेबंदीमुळे अडकले आहे.

सिनेमागृह
सिनेमागृह
author img

By

Published : May 4, 2020, 6:06 PM IST

Updated : May 4, 2020, 9:01 PM IST

कन्नड (औरंगाबाद) - कन्नड शहरात होळीच्या आठ दिवसांनंतर हजरत सिद्धिक शहा बाबांचा उर्स (यात्रा) भरतो. देशभरातून अनेक नागरीक या यात्रेसाठी येत असतात. त्याचबरोबर व्यापारी वर्ग ही या यात्रेत आपली दुकाने थाटतात. या यात्रेसाठी औरंगाबाद येथील प्रेम विलास हे आपल्या कामगारांसह फिरते सिनेमागृह घेऊन आले होते. पण, यात तेही अडकले आहेत. त्यांना आपापल्या घरी पोहोचण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी करत आहेत.

उरुसानिमित्त आले अन् लॉकडाऊनमुळे अडकले

सालाबादप्रमाणे, ही यात्रा भरेल या आशेने अनेक व्यवसायीक या ठिकाणी आले होते. त्यांप्रमाणेच आपले फिरते चित्रपटगृह घेऊन प्रेम विलास हे परप्रांतीय कामगारांसह आले होते. पण, टाळेबंदीमुळे हा उरुस भरला नाही. परिणामी हे येथेच अडकले. त्यांच्याजवळ असलेल्या पैशानी ते काही दिवस त्यांनी आपला उदनिर्वाह केला. पण, त्यांच्याकडील पैसे संपल्यानंतर त्यांना उपाशी रहावे लागले. ही बाब येथील वेलकम ग्रुपच्या लक्षात येताच त्यांनी खाण्यापिण्याची सोय केली. पण, त्यांना आपापल्या गावी जायचे आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याची शासनाकडून करण्यात यावी, तसेच शासनाकडून आर्थिक मदतही करावी, अशी मागणी या फिरत्या चित्रपटगृहाच्या मालकांनी व कामगारांनी केली आहे.

हेही वाचा - परजिल्ह्यातून विनापरवाना प्रवास, कन्नड तालुक्यातील दोघांविरोधात गुन्हा दाखल

Last Updated : May 4, 2020, 9:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.