ETV Bharat / state

Aurangabad Covin App Fake Certificate : लस न देताच दिले लसीकरण प्रमाणपत्र, कंत्राटी दोन डॉक्टरवर गुन्हा दाखल - औरंगाबाद लसीकरण प्रमाणपत्र घोटाळा

गुढी पाडव्यापासून राज्यात कोरोना नियमावली ( Gudi Padwa Corona Restriction Cancle ) रद्द करण्यात येत असतानाच शहरात कोरोनाच्या कोविन अँपवर खोटी ( Aurangabad Covin App False Data ) नोंद करून जवळपास 80 नागरिकांना लस न घेताच कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र ( Covid Certificate Without Vaccination ) देण्याचा धक्कादायक प्रकार महानगरपालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड सेंटरमध्ये घडल्याच समोर आल आहे.

Aurangabad Covin App Fake Certificate
Aurangabad Covin App Fake Certificate
author img

By

Published : Apr 3, 2022, 3:44 PM IST

औरंगाबाद - गुढी पाडव्यापासून राज्यात कोरोना नियमावली ( Gudi Padwa Corona Restriction Cancle ) रद्द करण्यात येत असतानाच शहरात कोरोनाच्या कोविन अँपवर खोटी ( Aurangabad Covin App False Data ) नोंद करून जवळपास 80 नागरिकांना लस न घेताच कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र ( Covid Certificate Without Vaccination ) देण्याचा धक्कादायक प्रकार महानगरपालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड सेंटरमध्ये घडल्याच समोर आल आहे. याप्रकरणी सिडको एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांवर गुन्हा दाखल - मेल्ट्रॉनच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली मुदगडकर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, कंत्राटी डॉक्टर डॉ. कॅमेडी झेन मॅथ्यू आणि कंत्राटी कर्मचारी साबरी मोहम्मद इम्रान या दोघांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नागरिकांना कोविडचा डोस न देता रजिस्टरमध्ये डोस घेतल्याची तसेच कोविन ॲपमध्येही ऑनलाइन नोंद करून प्रमाणपत्र दिले. अशी तक्रार दिल्याने कंत्राटी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा आला प्रकार समोर - 30 मार्च रोजी रुग्णालयात हजर असताना डॉ. मुदडकर यांनी लसीकरणाच्या रजिस्टर तपासले, त्यावेळी त्यांना हस्ताक्षरात तफावत असल्याच निदर्शनास आले. त्यांनी उपस्थितीत असलेल्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता ते सर्व हस्ताक्षर डॉ. कॅनेडी व साबरी यांचे असल्याचे त्यांना कळलं. त्यामुळे त्यांनी साबरी यांना विचारले असता त्यांनी डॉ. कॅनेडीच्या सांगण्यावरून नोंदी केल्याचे सांगितले. त्यामुळे शंका आल्याने डॉ. मुदगडकर यांनी सखोल तपास केला असता दोघांनी मिळून सर्व नोंदीच चुकीच्या नोंदी केल्याच आढळलं. तर लस घेण्याची इच्छा नाही, परंतु लसीचे प्रमाणपत्र पाहिजे, अशा लोकांकडून पैसे उकळून नोंदी केल्याचे त्यांच्या तपासात आढळले. त्यामुळे डॉ. मुदगडकर यांनी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यावरून गुन्हा दाखल केल्याची माहिती एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.

हेही वाचा - Raj Thackeray : राज कडाडले! राजकीय नेत्यांवर घणाघात; मतदारांचेही टोचले कान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.