ETV Bharat / state

औरंगाबाद : कचरा 24 तासात न उचलल्यास  ठेकेदाराला आता 1 हजार रुपये प्रति पॉईंट दंड - हर्सूल

शहरातील नऊपैकी सात प्रभागांमध्ये पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीकडून कचरा संकलन केले जाते. परंतु या सात प्रभागात कंपनीला समाधानकारक काम करता आले नाही. याशिवाय वर्गीकरण करून कचरा न घेणे, वजन वाढविण्याकरिता कचऱ्यात दगड, माती, विटा टाकणे आदी प्रकार समोर आले होते.

औरंगाबाद महानगरपालिका
author img

By

Published : Aug 12, 2019, 10:19 AM IST

Updated : Aug 12, 2019, 11:21 AM IST

औरंगाबाद- शहरातील कचरा संकलन करण्याचे कंत्राट पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने शहरातील कचरा टाकण्यात येणाऱ्या ठराविक ठिकाणांपैकी एखाद्या पॉईंटचा कचरा 24 तासात न उचलल्यास 1 हजार रुपये प्रति पॉईंट असा दंड घनकचरा विभागाच्यावतीने आता कंपनीला लावण्यात येणार.

औरंगाबाद महानगरपालिका

सुमारे दीड वर्षापूर्वी शहरातील नारेगाव परिसरात कचरा टाकण्यास स्थानिकांनी विरोध केल्याने मोठ्या प्रमाणावर कचरा कोंडीची समस्या निर्माण झाली होती. यातून मार्ग काढण्याकरिता शासनाने मनपाला आर्थिक मदतही केली. शासनाच्या या निधीतून मनपाने शहरातील चिखलठाणा, पडेगाव, कांचनवाडी आणि हर्सूल अशा चार ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचे निश्चित केले. यासह शहरातील कचरा संकलन करण्याचे तसेच हा कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत नेण्याचे कंत्राट बंगळुरु येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले. संबंधित कंपनीने फेब्रुवारी महिन्यात काम सुरू केले आहे.

आजघडीला शहरातील नऊपैकी सात प्रभागांमध्ये कंपनीकडून कचरा संकलन केले जाते. परंतु, या सात प्रभागात देखील कंपनीला समाधानकारक काम करता आले नाही. याशिवाय वर्गीकरण करून कचरा न घेणे, वजन वाढविण्याकरिता कचऱ्यात दगड, माती, विटा टाकणे आदी प्रकार समोर आले होते. यानंतर प्रशासनाने संबंधित कंपनीला 15 दिवसात कामात सुधारणा करा अन्यथा बिलात कपात करू, असा इशारा दिला. यानंतर आता घनकचरा विभाग पंधरा दिवस कंपनीच्या कामात सुधारणा होते का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

याचाच एक भाग म्हणून, शंभर टक्के कचरा संकलन होते का? तसेच वाहनांच्या जीपीएस ट्रॅकिंगची पडताळणी, यासह कचरा टाकण्यात येणारी 70 ठराविक ठिकाणे मनपाने निश्चित केली आहे. यातील एखाद्या ठिकाणी 24 तासापेक्षा अधिक वेळ कचरा तसाच पडून राहिल्यास कंपनीला प्रति पॉईंट 1 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. दिवसातील एका ठराविक वेळेला विभागाच्यावतीने या पॉइंटची पाहणी केली जाणार.

Intro:

कचरा संकलन करण्याचे कंत्राट देण्यात आलेल्या पी.गोपीनाथ रेड्डी कंपनीने शहरातील कचरा टाकण्यात येणाऱ्या ठाराविक ठिकाणापैकी एखाद्या पॉईंटचा कचरा 24 तासात न उचलल्यास 1 हजार रुपये प्रति पॉईंट असा दंड घनकचरा विभागाच्या वतीने आता कंपनीला लावण्यात येणार

Body:सुमारे दीड वर्षापूर्वी शहरातील नारेगाव परिसरात कचरा टाकण्यास स्थानिकांनी विरोध केल्याने मोठ्या प्रमाणावर कचरा कोंडीची समस्या निर्माण झाली होती. यातून मार्ग काढण्याकरिता शासनाने मनपाला आर्थिक मदतही केली. शासनाच्या या निधीतून मनपाने शहरातील चिखलठाणा, पडेगाव, कांचनवाडी आणि हर्सूल आशा चार ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचे निश्चित केले. यासह शहरातील कचरा संकलन करण्याचे तसेच हा कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत नेण्याचे कंत्राट बेंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले. संबंधित कंपनीने फेब्रुवारी महिन्यात काम सुरू केले. आज घडीला शहरातील नऊपैकी सात प्रभागांमध्ये कंपनीकडून कचरा संकलन केले जाते. परंतु या सात प्रभागात देखील कंपनीला समाधान कारक काम करता आले नाही. याशिवाय वर्गीकरण करून कचरा न घेणे, वजन वाढविण्याकरिता कचऱ्यात दगड, माती, विटा टाकणे आदी प्रकार समोर आले होते. यानंतर प्रशासनाने संबंधित कंपनीला 15 दिवसात कामात सुधारणा करा अन्यथा बिलात कपात करू असा इशारा दिला. यानंतर आता घनकचरा विभाग पंधरा दिवस कंपनीच्या कामात सुधारणा होते का? यावर लक्ष ठेवून आहे. याचाच एक भाग म्हणून, शंभर टक्के कचरा कलेक्शन होते का? तसेच वाहनांच्या जीपीएस ट्रेकिंगची पडताळणी, यासह कचरा टाकण्यात येणारी 70 ठराविक ठिकाणे मनपाने निश्चित केली असून, यातील एखाद्या ठिकाणी 24 तासापेक्षा अधिक वेळ कचरा तसाच पडून राहिल्यास कंपनीला प्रति पॉईंट 1 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. दिवसातील एका ठराविक वेळेला विभागाच्या वतीने या पॉइंटची पाहणी केली जाणारConclusion:
Last Updated : Aug 12, 2019, 11:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.